Posts

Showing posts from July, 2024

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील सन 1998- 99 या वर्षातील दहावी बॅचचे स्नेह मिलन संपन्न

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण परतुर येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील सन 1998- 99 या वर्षातील दहावी झालेले विद्यार्थी सर्व वर्गमित्र व शाळेत शिकवणारे शिक्षक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातून एकत्र आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी 25 वर्षांपूर्वींच्या आठवणींना उजाळा दिला.          यावेळी शाळेत शिकवणारे शिक्षक वृंद उपस्थित होते  शिक्षक सेवानिवृत्त झालेले असले तरी त्यांना बोलवून त्यांचा आहेर व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.       या शिक्षकांमध्ये  पाठक सर, सरफराज कायमखानी सर, इंगळे सर, नंद सर, जायभाये सर, देशपांडे सर,तायडे सर, खतीब सर, भराडे मॅडम, आत्ता कार्यरत असलेले मुख्याध्यापक राठोड सर व आठवे सर यांची उपस्थिती होती.          यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल काही जुन्या आठवणींना उजळा दिला . व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्याबद्दल बऱ्याच गोष्टींना, आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमांमध्ये काही विद्यार्थी आपल्या देशासाठी सेवा करून आलेले प्रशांत पुरी, राजेंद्र सोनटक्के भीमराव चाफे ...