Posts

Showing posts from August, 2026

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती

Image
जालना | प्रतिनिधी समाधान खरात  दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय दिगंबरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रानुसार, विजय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विचारांनुसार कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक-अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दलित महासंघ ही महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक संघटना असून, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. यावेळी विजय जाधव यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...