Posts

Showing posts from February, 2026

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विवेकानंद विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  राष्ट्रीय दृष्ट्या आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी NMMS परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये विवेकानंद विद्यालयाचे एकूण 71 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.       या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस. जी. बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक  संदीप  बाहेकर, तसेच मुख्याध्यापिका  श्रीमती. शिंदे मॅडम सर्व शिक्षक वृंद तसेच पालकांच्या वतीने या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक मांटे यांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

Image
बुलढाणा प्रतिनिधी राधेश्याम बंगाळे  कठीण परिस्थितीतून यश मिळवत यशाला गवसणी घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोगाच्या मार्फत 4 थ्या क्रमांकाने तब्बल दोन वेळा वर्ग 1 पदी निवड झाली त्यामध्ये समाज कल्याण विभागामध्ये सहाय्यक आयुक्त तसेच इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामध्ये सहाय्यक संचालक या पदांवर निवड झालेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगावचे सुपुत्र दिपक सु.मांटे यांचा दिनांक 23 फेब्रुवारी रोजी लोकसेवा नशामुक्ती व्यसन केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला ' यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला गावच्या सर्वांगीण विकासासाठी समाज कल्याण विभागामध्ये विविध प्रकारच्या योजनांची चर्चा केली.    तसेच एक आदर्श गाव बनवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या गावामध्ये लोकसहभागातून तसेच शासनाच्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून दरेगाव या गावांमध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले. आज रोजी तालुक्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून दरेगावचा नावलौकिक झालेला आहे. गावातील लोक जातीपातीचे राजकारण सोडून जेव्हा विकासासाठी एकत्र येते तेव्हा काय होऊ शकतं याचं दरेगाव...

महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवडपत्राचे मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण!

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' चे जालना जिल्ह्यातील पुरस्कार्थीना आज मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करून निवडपत्र प्रदान करण्यात आले.   सर्वप्रथम दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्यसमन्वयक भगवान जायभाये यांनी केले.बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, घनसावंगी चे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, समता शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण जोशी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जालना जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र शिक्षक पॅनल आणि पुरस्कार्थी श्रीम. साधनाताई गिऱ्हे, विकास पोथरे, श्रीनिवास सुदेवाड, निलेश सोमवंशी, भाऊसाहेब खाडे, शामराव टेकाळे, रणधीर पाटील, भाऊसाहेब कोलते, सिद्धार्थ म्हस्के, श्रीम. स्नेहल पवार, श्रीम दीपाली जोंधळे, श्रीम फरहत तांबोळी, निर्वती भालेकर, मनोहर विरकर, आवेज पठाण या शिक्षकांचे अभिनंदन तसेच कौतुक केले.   ...

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2026 जाहीर अध्यक्षपदी अतुल हजारे पाटील सचिवपदी नामदेव गोरे

Image
परतूर प्रतिनिधी  संतोष शर्मा  शहरात सर्व पक्षीय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्सव समिती बैठक घेण्यात आली या मध्ये सर्वानुमते समिती जाहीर करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी अतुल हजारे तर सचिवपदी नामदेव गोरे यांची निवड करण्यात आली. परतूर येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार 9.00 वाजता शिवजन्मोत्सव समिती निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीतिच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल सोनपावले, विशाल शिंदे,सहसचिव रफिक सतार कुरेशी,कार्याध्यक्ष , विकास मोरे, कोषाध्यक्ष आकाश काळे, प्रवीण प्रधान तर संघटक म्हणून गोपी ठाकूर,प्रवीण पेडगावकर यांची निवड करण्यात आली सल्लागार म्हणून सावता काळे, अर्जुन राठोड, संभाजी घनवट,अर्जुन जगताप, ऍड सुरेश काळे,नरेश कांबळे, सिद्धेश्वर लहाने, विजय यादव  ही बैठक विठ्ठल दादा बरकुले (राष्ट्रवादी जिल्हा संघटक) यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली या वेळी संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण,डा प्रदीप सातोणकर,रमेश भापकर, शत्रुघ्न कणसे,संपत टकले,इझरान कुरेशी, रज्जाक कुरेशी, सतीश...

आनंद इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (क्रॉप सायन्स), परतूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  परतूर येथील आनंद इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (क्रॉप सायन्स) यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आनंद, उत्साह व सांस्कृतिक वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. सौ.प्रियंका राक्षे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सत्यशीला तौर या विराजमान होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका शीला राऊत, कल्पना डहाळे व स्नेहा अग्रवाल संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. मनीषा कदम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य नारायण सागुते यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, समूह नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम...