सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विवेकानंद विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश


परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा 
राष्ट्रीय दृष्ट्या आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी NMMS परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये विवेकानंद विद्यालयाचे एकूण 71 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.       या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस. जी. बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक  संदीप  बाहेकर, तसेच मुख्याध्यापिका  श्रीमती. शिंदे मॅडम सर्व शिक्षक वृंद तसेच पालकांच्या वतीने या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत