Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भाजयुमोचे प्रदेश महामंत्री लोणिकर यांचे बागेश्वरी साखर कारखाना चेअरमन यांना निवेदन

Image
परतूर(प्रतिनिधी) परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस पूर्णपणे संकलित केला जात नाही तोपर्यंत कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस आणू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी घेतली. *लोणीकर यांच्या या आक्रमक  भूमिकेसमोर कारखाना प्रशासन झुकले असुन कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस संकलित केल्याशिवाय बाहेरचा ऊस आणणार नाही अशा शब्दात कारखाना व्यवस्थापनाने लोणीकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला शब्द दिला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात आज परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन आक्रमकपण...

आरक्षण उपसमितीची जबाबदारी खा. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडे सोपवा, भाजपा जालना तालुका सरचिटणीस प्रा. सहदेव मोरे पाटील यांची मागणी

Image
मंठा(प्रतिनिधी ) काल मराठा आरक्षण  प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान यावेळी देखील मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडली असून न्यायमूर्ती नागेश्वरराव यांच्या खंडपीठानं मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली. तत्पूर्वी महाराष्ट्रातील विद्यमान राज्य सरकारचे वकील उपस्थित न राहिल्यानं सुनावणी स्थगित करावी लागली होती. मराठा आरक्षणासारख्या अति संवेदनशील विषयावर राज्य सरकार किती गंभीर आहे याची प्रचिती काल सुनावणी दरम्यान सकल मराठा समाजाला आली असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाराष्ट्र सरकारची इच्छा दिसून येत नाही त्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची जबाबदारी खा. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडे सोपवण्यात यावी अशी मागणी भाजपा जालना तालुका सरचिटणीस प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.  राज्य सरकारच्या या हलगर्जीपणावर मराठा समाजाने समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून  'सुप्रीम कोर्टात सरकारचे वकील मराठा आरक्षणासारख्या अतिसंवेदन सुनावणीला उपस्थित राहत नाहीत आणि त्यावर कळस म्हणजे आरक्ष...

भारतातील सर्वात स्वस्त पाणीपुरवठा करणारी योजना, 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1 हजार लिटर पाणी मिळणारा देशातील एकमेव प्रकल्प-माजी मंत्री आ.लोणिकर

Image
परतूर, मंठा व जालना तालुक्यातील 176 गावे व मंठा तालुक्यातील स्वतंत्र 95 गावांच्या दोन ग्रीड पाणी पुरवठा योजना ह्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून तिन्ही तालुक्यातील 110 गावात शुद्ध पाणीपुरवठा आज तारखेला सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्याचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1000 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. या दोन्ही योजनेसाठी एकूण 400 कोटी रु. खर्च केले जाणार आहेत. भारतातील सर्वात स्वस्त पाणी पुरवठा करणारी योजना असणार आहे अनेक ठिकाणी ग्रीडचे काम पूर्ण झाले असून छोट्या मोठे कामे करणे प्रलंबित आहेत. ही कामे तात्काळ पूर्ण करून पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिल्या. औरंगाबाद येथे आयोजित मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी मुख्य अभियंता लोलापोड, अधीक्षक अभियंता अजयसिंह, मनोज पांगारकर, ॲड. वीरेंद्र देशमुख, कार्यकारी अभिय...

परतूर पोलीस ठाणे येथे आयपिएस गोहर हुसेन रूजू

Image
  परतुर (प्रतिनिधी) परतुर तालूका अंतर्गत येणारे परतूर पोलीस स्टेशन येथे  दिनांक 26 सोमवार रोजी ट्रेंनीग साठी आय पी एस गौहर हसन यांनी आज परतूर पोलीस स्टेशन येथे पदभार घेतला आहे   असून शहरातील राजकिय पूढारी,पत्रकार,शांतता कमिट चे सदस्य,पत्रकार , नागरिकांनी त्यांचा सत्कार केला ते मुळ बिहार येथील रहवासी आहे गोहर हसन यांनी  सांगितले  की या पुढे गुन्हेगारांवर वचक निर्माण करून त्यांना शिस्त लावन्याचे काम करणार   असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी  दिली शहरातले नागरिक साठी कोरोना चा प्रदूर्भाव संपलेला नसल्याचे  त्यांनी सांगितले  . परतुर शहरातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियामचे पालन करावे सोशल डिस्टनसिंग आणि मास्क चा वापर करावा कोरोना हां पूर्ण पने संपलेला नाही असी माहिती दिली      

मराठवाडा मंडळातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पदोन्नती बाबत होत असलेल्या अन्यायाविरोधात सामूहिक रजा आंदोलन

Image
परतूर प्रतिनिधी  मराठवाडा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नती, कालबध्द पदोन्नती व इतर बाबतीत विभागीय व शासन स्तरावरून होत असलेल्या अन्यायाबाबत परतुर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने 28 व 29 ऑक्टोबर रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात परतूरच्या तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद विभागात रखडलेल्या पदोन्नत्या बाबत व प्रलंबित विभागीय चौकशी, फौजदारी खटल्यातील अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळाधिकारी, महसूल सहाय्यक तलाठी वाहन चालक शिपाई कोतवाल कर्मचारी यांच्या बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही मागण्याबाबत शासनाने कोणतीही चर्चा न केल्यामुळे व मंजूर न केल्यामुळे विभागीय अध्यक्ष मराठवाडा महसूल कर्मचारी संघटना औरंगाबाद यांनी पुकारलेल्या 28 व 29 ऑक्‍टोबरच्या दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलनाला परतूर महसूल कर्मचारी संघटनेचे अधिकारी व कर्मचारी पाठिंबा देणार आहेत. तहसीलदारांना देण्यात आलेल्या नियोजनावर एस.जी. पवार, ए.जी. शिंगाडे, व्ही.यु. पुरी, अब्दु...

संगायो इंगायोत उत्ककृष्ट काम केल्या बद्ल परतूर येथील अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार संपन्न

Image
संगायो इंगायो या योजने अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान लोकनेते माजी मंत्री आमदार बबनरावजी  लोणीकर .यांच्याहस्ते करण्यात आला या मधे परतूर  च्या तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक . गट विकास अधिकारी गुंजकर साहेब सह संजय गांधी विभागातील नायब तहसीलदार  श्रीमती एम .एम .मोरे. ए.बी देशपांडे. एस. सरकटे मॅडम. प्रमोद कुलथे. यांच्यासह  संजय गांधी वीभागातील सर्व  कर्मचाऱ्यांचा सत्कार  एका कार्यक्रमात करण्यात आला. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकर स्वास्थ लाभावे या करीता देवीला होम हावन करून साकडे

Image
घनसांवगि(प्रतीनिधी)महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते मा.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांनी कोरोनवर लवक रात लवकर मात करून जनतेच्या सेवेसाठी व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकर बरे व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवी दहेगाव  येथील रेणुका देवी संस्थान येथे होम हवन करून साकडे घालण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा अ.जा. मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पांढरे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश ढोणे,भाजप अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष रामदास भालेराव,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामेश्वर सोळंके,भाजपा प्रसिध्दी प्रमुख रामेश्वर गरड,अ.जा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटोळे,अ.जा.मोर्चा जिल्हा सरचिटणीस किरण गुढेकर,अ.जा मोर्चा अंबड तालुकाध्यक्ष सुहास साबळे, अ.जा मोर्चा जाफराबाद ता.अध्यक्ष प्रदीप जाधव,प्रसिध्दी प्रमुख सुनील शेंडगे,भाऊसाहेब देवडे,जगन्नाथ मुळे,अमोल काळे,संदीप काळे,डीगांबर धांडे,बूथवेल लालझरे,सुनील गुढेकर,विजय ...