Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड.बागल तर सचिवपदी जमीनदार

Image
परतूर प्रतिनिधी - परतूर वकील संघाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड.जगन्नाथ बागल  सचिवपदी ऍड.वसीम जमीनदार तर ग्रंथालय सचिवपदी ऍड.नितीन मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.   वकील संघाच्या सभागृहात ऍड. राजेश अंभुरे,व ऍड. राजेश पाईकराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका विशेष बैठकीत २०२१ या नव्या वर्षाची वकील संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.      यावेळी जेष्ठ वकील ऍड.झेड.ऐन.कादर,अनिल देशपांडे,राजेश अंभुरे,ऐ.जे.देशमुख, व्ही.व्ही.बेरगुडे,बी.बी.चिखले,दीपक डहाळे,ऐ. व्ही. दराडे,अभय जवळेकर,राहुल लिंबूळकर,ओमप्रकाश राऊत,पी.डी. चव्हाण,अविनाश चामणीकर,अनंतराव मस्क,राजेश पाईकराव, पुरी मॅडम,महेंद्र वेडेकर, सुनील देशपांडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलण्यात महापाप करू नये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा कारखाना प्रशासनाला इशारा,कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा लोणीकर यांचा चेअरमन शिवाजीराव जाधव यांना मैत्रीपूर्ण सल्ला, शिष्टमंडळासह घेतली

Image
परतूर(प्रतिनिधी) परतूर व मंठा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले शेत, कुटुंबाचे दागदागिने गहाण ठेवून, त्याकाळात व्याजाने पैसे घेऊन कारखाना उभारणी करताना शेअर्स घेतलेले आहे आज श्रद्धा एनर्जी प्रा.लि.  असणारा तत्कालीन बागेश्वरी सहकारी साखर कारखाना त्याचे संस्थापक चेअरमन कै.माजी आमदार वैजनाथराव आकात यांनी काही दिवस हा कारखाना चालवला त्यानंतर कारखान्यात शेतकरी हितापेक्षा राजकारणाचा जास्त विचार केला गेला आणि त्यामुळे पुढे हा कारखाना विक्री काढणे इतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले, उसाची लागवड देखील कमी झाली, परिणामी कारखाना बंद पडला परंतु निम्न दुधना प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे आता परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून शेतकऱ्याच्या घामाच्या प...

सर्वसमावेशक पत्रकार विकास समितीची सभासद नोंदणी सुरू,समितीची कार्यकारिणी होणार निश्‍चित; शनिवारी बैठक

जालना । प्रतिनिधी - जिल्ह्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी नव्याने उभा राहत असलेल्या सर्वसमावेशक पत्रकार विकास समितीच्या सभासद नोंदणीला मंगळवार (दि 29) पासून सुरुवात होत आहे. या समितीची कार्यकारिणीही लवकरच निश्‍चित होणार असून इच्छुकांनी सभासद नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समितीच्या वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी (दि 2) तिसर्‍या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.   जालना जिल्ह्यातील पत्रकारांच्या कल्याणासह उज्ज्वल भविष्यासाठी सर्वसमावशेक पत्रकार विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत संपादक ते वृत्तपत्र वितरकापर्यंत प्रत्येक सदस्याच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग निश्‍चित केला जाणार आहे. समितीची घटना संहिता निश्‍चित करण्यासाठी आजपर्यंत पत्रकारांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. शिवाय समितीची प्राथमिक कार्यकारिणीही आगामी काळात ठरविण्यात येणार आहे. या समितीचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच वृत्तपत्राच्या प्रत्येक घटकाला समितीचे सदस्यत्व मिळणार आहे. याचाच अर्थ संपादक, पत्रकार, डिटीपी ऑपरेटर, छाय...

शिवसेना शाखाप्रमुख.महेश मल्लेकर व युवा सेना विभाग प्रमुख रोहित साळवे यांचाअंसख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश

Image
औरंगाबाद(प्रतीनीधी)     कोटला कॉलनी वार्ड क्रमांक 67 चे शिवसेना शाखाप्रमुख महेश मल्लेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे दुरदृष्टी असलेले विचार , संघटनात्मक ताकद व देशात सर्वात जास्त सभासद असलेला पक्ष अशा विविध विषयांना प्रेरीत होऊन खासदार डॉ भागवत कराड, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष . संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला.     शिवसेनेचे शाखाप्रमुख  महेश मल्लेकर यांच्या सह युवा सेना विभाग प्रमुख  रोहित साळवे, उपशाखा प्रमुख .अविनाश जगताप, उपशाखा .नितेश लांडगे, गटप्रमुख . साजन भद्रे, गटप्रमुख .शरद गवळी, गटप्रमुख .रुपेश खरे, गटप्रमुख .प्रवीण वाघमारे,गट प्रमुख .शैलेश धुपे, सह गटप्रमुख श्दीपक गोडसे, सहगट प्रमुख राहुल विश्वासू या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला.         याप्रसंगी खासदार डॉ भागवत कराड, शहराध्यक्ष .संजय केनेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मनोज पांगरकर, अनिल मकरीये, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष .एजाज देशमुख, शहर सरचिटणीस श्री.समिर राजूरकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्य...

श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन

Image
श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते  या ख्यानाचे मुख्य वक्ते ह भ प दत्तात्रय महाराज पवार यानी राम भक्ताला मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर ह भ प ज्ञानेश्वर माऊली वाघाळेकर चरणदास महाराज जनकवार याची प्रमुख उपस्थीती होती अयोध्या येथे मोठया प्रमाणावर राममंदीर बांधकांम सुरु असुन निधी संग्रह व प्रत्येक कुटुबां पर्यन्त संपर्क करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यन्त संपर्क करून त्याना या अभियानात समाविष्ट करणार असुन  मंठा तालुक्यातील  बेचाळीस हजार कुटुंबा पर्यन्त पोहचण्याचे लक्ष असल्याचे अभियान प्रमुख बालासाहेब बोराडे यांनी सांगीतले  यावेळी उपस्थीताना मार्गदर्शन करताना यानी या अभियानाबद्दल माहीती दिली तसेच प्रभू रामचद्र यांच्या जीवनपद्धतीवर प्रकाश टाकला प्रभू राम हे त्यागाचे प्रतिक होते मर्यादा पुरुषोत्तम राम हे सपूर्ण विश्वाचे पालन कर्त आहेत जो राम नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते' आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहा...

परतूर पोलिसांनी 12 हजार 400 रुपयांचा गांजा पकडला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

परतुर प्रतिनिधी /सय्यद वाजेद परतूर पोलिसांनी मोटर सायकल वरून गांजा घेऊन जाणाऱ्यांना पकडून 12 हजार 400 रुपयांचा जप्त केला असून दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परतूरकडून सेलूकडे दोघेजण मोटरसायकलवरून गांजा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परतूर पोलिसांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास परतूर-सेलू रोडवर वरफळ येथे सापळा लावला. त्यावेळी शंकर रामदास पवार (वय 21 वर्षे) आणि रामचंद्र अंकुश घोडे (दोघे रा. सेलू जि. परभणी) हे मोटारसायकल क्रमांक (एम.एच. 16 एएफ 7070) वरून 1238 ग्रॅम वजनाचा 12400 रुपये किमतीचा अमलीपदार्थ गांजा ताब्यात व कब्जात बाळगून वाहतूक करत असताना मिळून आले. त्यावेळी सदर मोटारसायकल चालकाने पोलीस पथकास पाहून त्यांची मोटारसायकल जोरात पळवून मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंख्याचा खाली बराशीत घातली. तेव्हा ही मोटारसायकल बराशीत जावून पडली. मोटारसायकल चालक सोनू उर्फ रामचंद्र घोडे हा तेथून बाजूला असलेल्या तारेच्या कंपाउंडवरून उडी मारून पळून गेला. मा...

ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

Image
1. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल 2. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल 3. जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल 4. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यांत द्यावी लागेल 5. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार 6. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे 7. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल 8. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार 9. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही 10. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल 11. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये 12. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये 13. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये 14. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 र...