Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेनेच्या वतीने योगेश कुलकर्णी यांचा सत्कार

Image
परतूर प्रतीनीधी हनुमंत दंवडे  धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे कलाकार परतूर शहराचे भूमिपुत्र योगेश कुलकर्णी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपट) या चित्रपटात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका उत्कृष्टपणे निभावल्या बद्दल परतुर शिवसेनेच्या वतीने योगेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.             यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, विकास खरात, उपशहरप्रमुख दिपक हिवाळे, राहुल कदम, संदीप पाचारे,श्री ठोंबरे,व परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतिने सत्कार करण्यात आला. कोरोणा काळ संपल्यानंतर प्रथमच या मराठी चित्रपटाने २० कोटीचा गल्ला जमलेला असून सर्व महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे. योगेश कुलकर्णी हा परतूर येथील भुमी पुञ असून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटात तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका हुबेहुब साक्षात न्याय दिल्या बद्दल योगेश कुलकर्णी यांचा खरोखरच परतुर वासि...

मंठा तालुक्यातील गुटका विक्री थांबेना...शहरात व खेड्या-पाड्यातील किराणा दुकानावर गुटखा विक्री जोरात ; संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष

Image
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ दि.३० शहरासह तालुक्यात गुटखा विक्री पुन्हा बोकाळली आहे. शहरातील प्रत्येक व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील किराणा दुकानात सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मंठा तालुका मराठवाड्यातील गुटखाविक्रीचे केंद्र झाले आहे.याकडे जिल्हा वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मागील तीन वर्षापासून गुटका विक्रीने कळस गाठला आहे.तालुक्यात व शहरात गुटका विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. गुटखा विक्री करणारे माफीया संबंधित विभागाला हाताशी धरून आपला काळाबाजार चालवत आहेत.याकडे वृत्तपत्र अथवा इतर कोणी यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तर त्यांची मुस्काट दाबी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. किवा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येते.यामुळे गुटका माफियाची दादागिरी शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पंधरवड्यात दोन-तीन दिवस गुटका विक्रीलाचा चाप बसला होता. परंतु पुन्हा आर्थिक हव्यासापोटी गुटखा विक्री गोरख धंदा शहर परिसरात व खेड्यापाड्यात बोकाळली आहे.    मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटका शहरा...

३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरी करा- प्रकाश सोनसळे धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य

Image
प्रतीनिधी हनुमंत दंवडे  आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश  सोनसळे यांनी अनेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.     आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन मा.ज्ञानेश्वर गाडेकर सर व सुंदरराव काकडे मंडलाधिकारी हस्ते करण्यात आले.  राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.महादेव हजारे ग्रामसेवक यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन गणेश सानप, बनसोडे  यांच्या हस्ते करण्यात आले.    यावेळी बोलताना प्रकाश  सोनसळे यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद ,महानगरपालिका,व शासकीय कार्यालये या ठिकाणी जयंती साजरी करण्यात यावी असे बोलताना सांगितले.   यावेळी शितल मतकर,पवन गावडे, विशाल प्रभाळे, सुधाकर वैद्य, सुभाष महानोर,कसपटे भैय्या,प्रभाळे भैय्या,वैध भैय्या, आदी समाज बांधव उपस्थित होते.

पोलिस पाटील तुकाराम शिंगटे यांचे निधन

Image
   परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे तालुक्यातील आनंदवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक पोलिस पाटील तुकाराम आंबादास शिंगटे यांचे अल्पशा आजाराने दि २८ मे २०२२ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षाचे होत.            त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, एक भाऊ, चार बहिणी, जावई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आनंदवाडी येथे शेतात दुपारी दोन वाजेचा सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.    

विकास कोरडे यांची नायब तहसीलदार बीड पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करताना प्रकाश सोनसळे (धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य व सहकारी )

Image
बीड प्रतिनिधी हनुमंत दंवडे  आज बीड येथे मा. विकास कोरडे साहेब यांची बीड तालुका नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला‌. यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज नेते महाराष्ट्र, डॉ.संतोष महानोर, नारायण भोंडवे, शीतल मतकर, पवन गावडे, प्रजित भोंडवे, बाळासाहेब गावडे, राहुल ठेंगल, विजय घोंगडे, महादेव सातपुते ,श्याम गाडेकर,काशीद मामा, सखाराम गोरे, विशाल प्रभाळे, मयुर खोमणे, योगेश केसकर , कृष्णा पितळे सरपंच, अविनाश बारणे,सुरेश देवडे, नारायण धापसे, महादेव हजारे, ग्रामसेवक ,ज्ञानेश्वर देवकते पोलीस, उपनिरीक्षक, कोकाटे सूर्यकांत , साईनाथ गावडे, सुधाकर वैद्य,शिवराम शिरगिरे, खांडेकर भैय्या ,परमेश्वर तागड, वैद्य सर,गुरव भैय्या, आजीनाथ भोंडवे,रूषीकेश भोंडवे, भाऊसाहेब भोंडवे, विश्वजीत ससाने ,अमर भोंडवे,आदींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

तळणी येथे गेल्या ६९ वर्षापासुन अंखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन ,सप्ताहाची सांगता सेवाधारी पौळ बाबा यांच्या काल्याच्या किर्तनाने

Image
तळणी प्रतिनीधी रवी पाटील तळणी येथील श्री संत नेमिनाथ महाराज याच्या ६९व्या पूण्य निमित्य चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता सेवाधारी पौळ बाबा यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली ( गोकूळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आंनदल्या नरनारी ) या अंभ गावर काल्याचे किर्तन केले हा काला फक्त भूतलावर भारतात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळेच या भूमीवर नामस्मरणाचे अध्यात्माचे पेव आहे भक्ती ही निस्वार्थ असावी त्यामध्ये कुठलाच स्वार्थ नसू नाही गवळणीची भक्ती जशी भगवान श्रीकृष्णावर होती त्यामुळे परमात्मा त्याच्या हाकेला धावून जात सत्य युगातील राजा हरिश्चद्राची साठ हजार वर्षाची तपश्चर्या केली तेव्हा देव भेटला त्या साठी त्याग निष्ठा व समर्पण व ईच्छा शक्ती असणे गरजेचे आहे आजच्या युगातील भक्ती ही नाटकी व स्वार्थी आहे मनुष्यावर संकट आली की तो भंगवंताचा धावा करू लागतो ईतका स्वार्थी मनुष्य झाला आहे    काला हा मानवी जीवनासाठी एक अमृतच आहे जो काला घेण्यासाठी भंगवंताला मश्य अवतार घ्यावा लागला तरी सुध्दा तो भंगवंताला मिळाला नाही ब्रम्हदेवाला न मिळालेला काला तुम्हा आम्हाला...

शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार द्विभाषिक पुस्तके

Image
 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ  दि.२६समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता मराठी, उर्दू व सेमी इंग्लिश माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सदर योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे.मंठा पंचायत समिती अंतर्गत मंठा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व शासकीय १४९ तसेच खाजगी अनुदानित १९ शाळांतील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या २०८४, इ. दुसरीच्या १९६९, इ. तिसरीच्या २०५५, इ. चौथीच्या २०३६, इ. पाचवीच्या २०४३, इ. सहावीच्या २०१२, इ. सातवीच्या १९४३ व इ. आठवीच्या २३५१ अशा एकूण १८५३६ लाभार्थी विद्यार्थ्यांना तसेच उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिली ८०, दुसरी ७४, तिसरी ७४, चौथी ८०, पाचवी ९१, सहावी ८५, सातवी ८०, आठवी ७९ अशा एकूण ६४३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे.  एकूण पुस्तक मागणी संख्येपैकी आजपावेतो मराठी माध्यामाची ९६ टक्के तर उर्दू माध्यमाची ९० टक्के पाठ्यपुस्तके गट साधन केंद्र मंठ...