Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना जगद्गुरू तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठाण चा वारकरी सेवा पुरस्काराने , सेवा पुरस्कारामुळे मी धन्य झालो -माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
प्रतिनिधी समाधान खरात  माझ्या राजकीय जीवनातील गेल्या 40 वर्षांमध्ये मी रंजल्या गांजल्याची सेवा करण्यास प्राधान्य दिले हे करत असताना अनेक संकटाचा सामना मला करावा लागला परंतु श्रीहरी विठ्ठल कृपेमुळे हे सर्व करता आले असे प्रतिपादन राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते मोरवड ता वडवणी जि बीड येथे जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान मोरवड तालुका वडवणी जिल्हा बीड च्या वतीने स्व जगन्नाथ सिताराम शेंडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ दिला जाणारा वारकरी सेवा पुरस्कार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना प्रधान करण्यात आला यावेळी आपल्या धन्यवाद पर भाषणात बोलत होते स्व जगन्नाथ सिताराम शेंडगे यांच्या द्वितीय पुण्यस्मनानिमित्त कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कीर्तन सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पुरस्काराचे वितरण पंडित उद्धव बापू आपेगावकर, ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे हभप पंडित महाराज क्षीरसागर ह भ प वसंत महाराज यांच्या शुभहस्ते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी पुढे बोलताना माजी...

हिंदु धर्माचे काम वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करणार: सिद्धेश्वर काकडे

Image
जालना समाधान खरात     हिंदु धर्माचे काम वाढुऊन प्रभु. श्रीरामाच्या आशीर्वादाने भगव्याची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. जिथे जिथे हिंदु धर्माचे देव देवस्थानं व तीर्थ क्षेत्र आहेत. तिथे भेटी देऊन मंदिराची आनेक ठिकाणी बिकट झालेली अवस्था चांगल्या प्रकारे करून धर्म कार्य वाढवणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. यासाठी लागणारा निधी आपण उभा करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे.     हिंदु धर्माचे कार्य हे आता वाढवण्याची वेळ आलेली असून प्रत्येकाने धर्म कार्यात आपला वेळ देणे गरजेचे असून जर हे काम नाही वाढवलं तर? पुढील दिशा गंभीर अासेल म्हणून राजकारण बाजूला करत सर्वांनीच हिंदु धर्म कार्यात वाटा घेतला पाहिजे असे मत श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेना नेते सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केले आहे. आपण आपल्या धर्माचे का...

परतूर येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेची बैठक संपन्न..

Image
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे  दिनांक 14/ 9 /2022 वार बुधवार रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे राज्य अध्यक्ष बापूराव काने महाराष्ट्र सचिव, रामदासजी खोत मराठवाडा अध्यक्ष, शिवाजीराव गाडे यांच्या आदेशाने नवनिर्वाचित जिल्हाअध्यक्ष श्री .मोहन मुंडे यांच्या नेतृत्वात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना परतुर तालुक्यातील नवीन कार्यकारणी व तसेच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या विषयी जिल्हाध्यक्ष श्री .मोहन मुंडे यांनी चांगले मार्गदर्शन व दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या याविषयी चर्चा करण्यात आली. शासकीय विश्रामगृह परतुर या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली असंख्य दिव्यांग बांधव या वेळी उपस्थित    ज्ञानेश्वर आडे ,हनुमान माने, माऊली कदम ,शंकर शिरगुळे, दादाराव बकाल ,अशोक तनपुरे, बजरंग वैष्णव ,बाबजी भुंबर, जिजाभाऊ मांटे, बाळू वाघ, आसाराम आबुज ,उमेश गुंजकर, कैलास सोळंके, श्रीकांत सोळंके, शामराव सोळंके ,अंकुश जाधव, गणपतराव मोरे ,आकाश सोळंके, अर्जुनराव बिडवे ,कपाळे. गेनाजी ,  मिंड ,निळकंठ ,नळगे ‌ ,फिरोज शेख, बद्रुद्दीन इनामदार ,व परतुर तालुक्यातील सर्व दिव्य...

लंपी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केल्या सूचना,लसीकरणासाठी निधीची उपलब्धता नसेल तर आमदार फंड किंवा जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी करणार पत्रव्यवहार

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात   देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये लंपी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसून येत असून यामुळे अनेक जनावरे दगावत आहेत हा संसर्गजन्य रोग असून विशेष करून गाईंमध्ये या रोगाचे प्रमाण वाढत असल्याने जालना जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले आहे  या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गोमाता आणि पशुधन वाचवण्याला प्राधान्य क्रम देणे गरजेचे असून यासंदर्भामध्ये आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून निधीची कमतरता असल्यास गरजेप्रमाणे आमदार फंड किंवा जिल्हा नियोजन मंडळातील निधी खर्चाची परवानगी घेणार असल्याचे म्हटले आहे या संदर्भात पुढे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की कोरोना काळामध्ये मास्क सॅनिटायझर व इतर उपयुक्त किटच्या खरेदीसाठी आमदार फंडामधून निधी खर्चाची परवानगी देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर गोधन वाचवण्यासाठी व संपूर्ण लसीकरण करून...

राजस्थानी नवरात्र महोत्सव कार्यकारिणी अध्यक्ष शरद भारुका उपाध्यक्ष शुभम ओझा तर सचिव रोहीत पोरवाल

Image
परतूर : प्रतिनिधी हनुमंत दवंडे  प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने नवा मोंढा भागात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवात यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येणार आहे      महोत्सवाच्या कार्यकारिणीची निवड  सर्वानुमते करण्यात आली  अध्यक्ष :  शरद भारूका, उपाध्यक्ष:-  शुभम ओझा , सचिव:-  रोहीत पोरवाल  कोशाध्यक्ष:-  स्वप्निल भंडारी, सहसचिव:-  अभिषेक अग्रवाल , कार्याध्यक्ष:-  सौरभ बागड़िया , कार्यकारी सदस्य : गोविंदजी मुंदड़ा,  अक्षय नहार,  वैभव सोमाणी, ललीत मोर, मार्गदर्शक  निखिलजी अग्रवाल, राजेन्द्रजी पोरवाल, योगेशजी खंडेलवाल, आनंदजी कोटेचा यांचा समावेश करण्यात आला असून  या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले यात गरबा नृत्य, भजनांचा कार्यक्रम, सुशील बजाज यांचा नवरात्र व जम्मा जागरण कार्यक्रम आयोजित केल असल्याचे अध्यक्ष शरद भारूका यांनी माहिती दिली.

वलखेड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ग्रामविकास पॅनल सर्वाधिक मतांनी विजयी...

Image
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे परतूर तालुक्यातील वलखेड येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी विश्वनाथ केरोबा बिल्हरे विजयी झाले आहेत. या विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये ग्रामविकास पॅनलचे एकूण 8 उमेदवार रिंगणात उतरले होते. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे त्यांना मिळालेली मते  बील्हारे विश्वनाथ केरबा सर्वसाधारण 107 मताधिक्यांनी विजयी झाले. ड वारे सुभाष त्रिंबक 104 मते, डवारे भागवत विश्वनाथ 83 मते, डवारे कुंडलिक बापूराव 88 मते, डवारे विठ्ठल ज्ञानोबा 75 मते, सुरुंग प्रभाकर दादाराव 88 मते, सुरुंग विश्वनाथ रामकिसन 77 मते, सुरंग सुभाष बाबासाहेब 79 आशा मताधिक्यांनी उमेदवार विजयी झाले आहेत आणि यांच्या या विजयाबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार व आभिनंदन करण्यात आले. दैनिक चकमक च्या प्रतिनिधीशी बोलताना लक्ष्मण बिल्हारे यांनी सांगितले की विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.

तळणी महसूल मंडलाचा अतिवृष्टी भाग म्हणून घोषित करावा - कैलाश सरकटे

Image
 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ       दि.१३ मंठा तालुक्यातील तळणी महसूल मंडळात सतत होणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे.       यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस,मुग,उडीद या पिकाचा शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच बहुतांश ठिकाणी नुकसान झाल्यामुळे पंचनामे करणे शक्य नसल्यास सर्व तळणी मंडळाचा भाग अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कैलासराव सरकटे यांनी मंठा तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.