Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी बाबासाहेब गाडगे यांची फेर नियुक्ती

Image
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण  अखिल भारतीय कॉंगेस कमिटीचे अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे, व प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजु, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेनुसार एका पत्रकाद्वारे कोंगेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बाबासाहेब उद्धवराव गाडगे यांची नियुक्ती परतूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना अभिप्रेत असलेले पक्षकार्य सोबत घेऊन जोमाने करावे व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्तीबद्दल बाबासाहेब गाडगे यांचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, आमदार राजेश राठोड, अनवर देशमुख, नितिन जेथलिया,  माऊली तनपुरे, सुरेश सवने, हाजी साहब, इंद्रजीत घनवट, वैजनाथ बागल, प.स. सदस्य बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके, शेख शाकेर, बी.एन हिवाळे, राजेश भुजबळ, प्रमोद डुकरे, लक्ष्मण शिंद...

सत्ता गमावल्याचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे षडयंत्र! - भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

Image
प्रतिनिधी  कैलाश चव्हाण  अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव करून त्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे, असा थेट आरोप आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केला आहे. वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे ठाकरे सरकारचे अपयश उघडकीस येऊ नये यासाठी उलटा कांगावा करण्याचा प्रयत्न पुरता फसल्यानंतर आता महाराष्ट्राशी कोणताच संबंध नसलेल्या उद्योगांची खोटी यादी पुढे करून जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचे उद्योग ठाकरे पितापुत्रांनी सुरू केले आहेत. प्रत्यक्षात ज्या उद्योगांशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे यांनी साधी चर्चादेखील केली नव्हती, सामंजस्य करारही झाला नव्हता, किंवा सरकारमार्फत कोणताही पत्रव्यवहारदेखील झाला नव्हता, अशा उद्योगांची खोटी यादी पुढे करून एक अपप्रचाराचे टुलकिट तयार करण्याचा या पितापुत्रांचा प्र...

30 ऑक्टोबर रोजी जालन्यात भाजपा युवा मोर्चा नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार

Image
प्रतिनिधी समाधान खरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी युवा नेते राहुल लोणीकर यांची निवड झाल्याबद्दल दिनांक ३० ऑक्टोबर रविवार रोजी वृंदावन गार्डन, हॉटेल गॅलेक्सी जालना भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार कैलास गोरंट्याल माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार संतोष दानवे आमदार नारायण कुचे आमदार राजेश राठोड माजी आमदार अरविंद चव्हाण माजी आमदार विलासराव खरात माजी आमदार चंद्रकांत दानवे माजी आमदार संतोष सांबरे रिपाईचे नेते ब्रह्मानंद चव्हाण उद्योगपती घनश्याम शेठ गोयल शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर सतीश टोपे भास्करराव दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४:०० वाजता हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. जिल्हाभरातील युवकांसाठी प्रेरणास्थान असणारे राहुल लोणीकर यांची निवडणे महाराष्ट्रातील युवांसाठी काम करणाऱ्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी झाल्यानंतर जिल्हाभरात फटाके कडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला होता मागील काळात ४२ पेक्षा अधिक मोठी व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून येथ...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या निवास स्थानी दीपावली पाडवा स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न..

Image
 परतुर/( प्रतिनिधी) कैलाश चव्हाण      ता.२७ रोजी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या वतीने दीपावली - पाडवा स्नेहमिलन कार्यक्रम लड्डा काँलनी परतूर येथे आयोजित केला होता      या कार्यक्रमास जिल्ह्यातील राजकीय, नामांकीत व्यक्ती ,प्रतिष्ठित व्यापारी, लोकप्रतिनिधी ,शासकीय कर्मचारीसह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रदीपकुमार लड्डा ,माजी नगराध्यक्ष विनायक काळे, शिवसेना नेते रामेश्वर अण्णा नळगे,काँग्रेसचे युवा नेते नितिन जेथलीया तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे,नगरसेवक अंकुश बापू तेलगड, राखे नाना आरेफ आली, सादिक खतीब, राजेश खंडेलवाल ,सिध्दार्थ बंड, अजिज सौदागर, मुरली देशमुख ,आयुब कुरेशी , संदीप पाचारे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल नाटकर, प्रदीप साळवे, बाळू कदम, प्रहारचे शिवाजी सवणे ,तसेच आरपिआयचे बळीराम हिवाळे ,सर्जेराव प्रधान ,आशोक पुरुळेसह तालुक्यातील विविध पक्षाचे लोकप्रतीनिधी,परतूर पञकार,वकील,प्रध्यापक, शिक्षक वर्ग, सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्याप...

ह.भ.प. भागवताचा-र्या रूपालीताई सवने यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Image
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उदगीर यांच्या वतीने राष्ट्रवादी कोंग्रेस सेवादलचे मराठवाडा अध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात परतूर तालुक्यातील दैठना खुर्द येथील महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार माजी गृहराज्य मंत्री आमदार संजय बनसोडे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.    ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी करत असलेल्या धर्म जागृतीचा, संस्कार जागरणाचा आणि ज्ञान साधनेचा प्रचार आणि प्रसार करून शब्दसिध्दी अमृतवानीने कीर्तनाने आणि प्रबोधनाने समाज प्रभावित होत आहे.  महाराष्ट्रात केलेल्या व करत असलेल्या धर्म, संस्कृती आणि नैतिक मूल्यांच्या जागरणामुळे गंगासागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळातर्फे ह.भ.प.भागवताचा-र्या रूपालीताई रामेश्वर महाराज सवने यांना दि २२ आक्टोंबर २०२२ रोजी समाजरत्न प...

मतदार संघातील जनतेच्या प्रेमाने आशीर्वादाने भारावलो कायम जनतेच्या ऋणात राहील - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,येणाऱ्या विधानसभेत २०० पेक्षा अधिक मतदार संघात युवा मोर्चा निर्णायक भूमिका निभावणार - युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा निर्धार,परतूर येथे लोणीकरांच्या उपस्थितीत दिवाळी स्नेह मिलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतुर विधानसभा मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले असून जनतेच्या प्रेमातून मी कदापि उतराई होणार नाही उलट कायम जनतेच्या ऋणात राहील जनतेच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहील अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या परतुर येथे आयोजित दिवाळी स्नेह मिलन व स्नेहभोजन कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी लोणीकरांसह मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी उपस्थित त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या राहुल लोणीकर यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी घराणेशाहीची टीका केली होती त्या टीकेला उत्तर देताना आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की राहुल लोणीकर यांची निवड ही पूर्णपणे त्यांच्या कर्तुत्वावर अवलंबून असून राहुल लोणीकर यांच्या कामाची पावती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कर्तुत्ववान व्यक्तीच्या कामाची दखल घेतली जाते तशी इतर पक्षात घेतली जात नाही म्हणून जयंतराव पाटील यांनी भाजपच्या घराणेशाहीची चिंता करू नये त्यापेक्षा स्व...

शंभर रुपयात लाभार्थ्यांना शिधा किट वाटपपरतूर: लाभार्थ्यांनमध्ये समाधान

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण          राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत तालुक्यातील शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना दिवाळी सना निमित्त शंभर रुपयात चार वास्तुनचा एक सच याप्रमाणे आनंदाची शिधा किट प्रत्यक राशन दुकानदाराकडून वितरण करण्यात येत आहे.सर्व सामन्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी यासाठी राज्य शासनाने शंभर रुपयात रवा,चांनाडाळ,एक लिटर तेल निर्णय घेण्याचा निर्णय घेतला होता.यात परतूर तालुक्यातील स्वस्थ धान्य दुकानदाराने कडून आनंदाच्या शिधा चे वाटप सुरू करण्यात आले आहे.  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तहसिल कार्यालय अंतर्गत 122 रास्त भाव दुकानदारा मार्फत सदर शिधापत्रिका सच लाभार्थी वितरण करण्यात येत आहे.याचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावी  प्रकाश जाधव,पुरवठा निरीक्षक परतूर  वाढती महागाई यामुळे सना वर संकट उभे राहते शासनाने शंभर रुपयात शिधा किट दिल्याने समाधान मिळाले आहे. ऋषिकेश खरात, लाभार्थी, परतुर दिवाळी निमित्ताने नागरिकांन साठी राज्य शासनाने कडून शिधा किट चे वितरण करण्यात येथे आहे.ऑनलाईन प्रणाली चालत नसल्याने ऑफलाईन पध्दतीने शि...