Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर येथील येथे वीज कर्मचारी संपावर

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतूर येथील महावितरण कंपनी मधील सर्व कर्मचारी अधिकारी वीज खाजगीकरणच्या विरोधात आज पासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत              अदानी इलेक्ट्रिक कंपनीच्या वतीने भांडुप परिमंडळा मधील ठाणे व वाशी मंडळातील महावितरण कंपनीच्या क्षेत्रातील भागासाठी खाजगी वीज वितरण परवाना मिळावा यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. यास महावितरण कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तसेच बाह्य कंत्राटी कामगार यांना कायम करण्यात यावे यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे        या संपामध्ये वीज कर्मचारी अधिकारी अभियंते बाह्य कंत्राटी कामगार तसेच संघटनाचे पदाधिकारी एन. व्ही बेंडाळे, रमेश आढाव, जी ए चंदेल,पी एस गणेर, आर डी वायाळ, गुलाम यासीन,सुभाष कांबळे, नौशाद काजी वा वाहेद काजी इतर महिला कर्मचारी तसेच सर्व विजकर्मचारी अभियंता अधिकारी बाह्यकंत्राटी कामगार संपूर्ण संपामध्ये सहभागी झालेले आहेत.....

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आज सातोनकर हॉस्पिटल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर तर प्रमुख पाहुणे म्हणून समता परिषदचे तालुका अध्यक्ष परमेश्वर ढवळे व नगरसेवक कृष्ण आरगडे होते             स्त्रियांना मान व असित्वाच भान देण्याचं महत्वाचं कार्य या सावित्रीमाई केल आसे विचार आपल्या भाषणातून नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर यांनी व्यक्त केले या प्रसंगी ज्ञानेश्वर काळे तुकाराम जईद संजय राऊत भैय्या माने प्रमोद जईद किरण मगर सुमित माने सचिन मगर उध्दव वाघमारे उपस्थित होते 

दत्तात्रय खुळे यांना राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील       तळणी येथील युवा कवी साहीत्यीक दत्तात्रय खुळे यांचा राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने सम्मान साहित्य क्षेत्रातील दत्तात्रय खुळे अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक पटकावले आहेत याआधी त्यांना समाजभूषण , काव्यगौरव पुरस्कार , ऑथर ऑफ द इअर अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एच पी गॅस तळणी येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना आपली नोकरी सांभाळून आपला छंद जोपासणारा उमदा कवी दत्तात्रय खुळे यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहु उद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील हिवाळी अधिवेशनात सेवा निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव , माजी महापौर उषाताई ढोरे, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी सौ शीतल नगराळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ मधूसुदन घाणेकर,संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे सर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात आजही विविध क्षेञा मध्ये छाप टाकणारे तरुण पूढे येत असून त्याना खरी गरज आहे ती व्यासपीठाची कलेचे सादरी करण करण्यासाठी आजही क...

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना तालुक्यातील खरपुडी येथे सैनिकी शाळेजवळ असलेला बौद्ध धम्माचा पंचरंगी ध्वज अज्ञात व्यक्तीने पाडल्याची घटना आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनाश आली.      सदरील घटना खरपुडी शिवारातील गट नं. 197 मध्ये   घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून तालुका पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरातील नागरिकांनी अज्ञात व्यक्तीने ध्वज पाडल्या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केले आहे. हा धम्मध्वज पाडणार्‍यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनास्थळावर तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांच्यासह पोलीस पथक, महसूल विभागाचे पथक आणि पंचायत विभागाचे पथक दाखल झाले आहे. सध्या आंदोलकानी रस्ता रोको आंदोलन सकाळपासून सुरू केले असून गुन्हा दाखल होईपर्यंत रस्त्यावरून न उठण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.     वातवरण तनाव पूर्ण असले तरी शांतता रास्ता रोको चालू आहे

अविनाश कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह अंकुर येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप

Image
   परतुर प्रतिनिधी कैलास चव्हाण           येथील युवा सेना चे तालुका प्रमुख (बाळासाहेबांची शिवसेना)अविनाश कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त परतुर येथून जवळच असलेले मापेगाव पुनर्वसन या गावात स्नेह अंकुर हे ने अंकुर निराधार विद्यार्थ्यांचे वस्तीग्रह आहे या वस्तीग्रह मध्ये तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले      याप्रसंगी अविनाश कापसे यांचा तेथील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अविनाश कापसे यांनी सांगितले की कुठलाही जाहिरात किंवा बॅनर बाजीवर खर्च करण्यात ऐवजी आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आशा निराधार मुलांना मदत केली पाहिजे यामुळे एक आत्मिक समाधान लाभते यापुढेही आपण नेहमीच अशा निराधार मुलांना नेहमीच मदत करत राहू हा उपक्रम आमचे जिल्हाप्रमुख मोहनजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेत आहोत असे त्यांनी शेवटी सांगितले     या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख,अमोल सुरुग, नितीन राठोड, शिवाजी तरवटे, दत्ता अंभुरे ,अभिजीत सुरुशे, दिपक हीवा...

ग्राऊन्ड रिपोर्ट : तळणी प्राथमिक आरोग्य केद्रांचा कारभार राम भरोसे

Image
तळणी प्रतीनीधी रवी पाटील तळणी " मंठा तालूक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या तळणी येथील प्राथमिक आरोग्य केद्रांचा कारभार हा राम भरोसे च आहे दोन मेडीकल अधिकारी व १५ कर्मचार्याची आरोग्य विषयक समस्याची सपूर्ण .जबाबदारी असताना सुध्दा आज प्रत्यक्ष्य पाहणीत सातच कर्मचारी उपस्थीत असल्याचे निदर्शनास आले यामध्ये यु एल कुटे मनिषा घनसांवंत सदीप गहीलोद आदेश घुले स्वाती सुरूसे नवनाथ सपाटे सचिन डोगरे हे कर्मचारी वेळेत उपस्थीत आढळून आले तर दोन वैद्यकीय अधिकारी असलेल्या केद्रात वेळेच्या आत दोनही वैद्यकीय अधिकारी गैरहजर दिसून आले एका कर्मचार्यानी वैद्यकीय अधिकारी एम आर चव्हाण यानां .सपर्क करून बोलावून घेतले  तळणी ग्रामस्थ ज्ञानेश्वर राठोड यानि जिल्हाधिकार्याला दिलेल्या निवेदनात सागीतले की तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांचे आरोग्य कर्मचारी वेळेवर उपस्थीत राहत नसून रुग्नाची हेळसांड होती ग्रामस्थ राठोड यानी स्वःत आरोग्य केद्रांची पाहणी केली असता उपस्थीती पटावरील १७ कर्मचार्या पैकी पाच कर्मचारी उपस्थीत होते तळणी प्राथमीक आरोग्य केद्रांच्या अतर्गत दहा ते पंधरा गावे येत अ...

परतुर आरोग्य कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी संजय राऊत तर सचिव पदी अंकुश चव्हाण

Image
 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण         येथील पंचायत समिती सभागृह येथे दिनांक 28 रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली        या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल सिंग ठाकूर, आर आर तोटे आरोग्य पतसंस्था संचालक , साथरोग अधिकारी डॉक्टर नागदरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती       या बैठकीत आरोग्य कर्मचारी संघटनेची निवड करण्यात आली यामध्ये सर्वानुमते संजय राऊत यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिव म्हणून अंकुश चव्हाण यांची निवड करण्यात आली कोषाध्यक्ष अशोक आडे तालुका महिला कृती समिती अध्यक्ष श्रीमती सोनाबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी यांनी नवीन कार्यकारणी शुभेच्छा दिल्या