Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रामायणातून अत्याचारा विरोध लढण्याचं बळ मिळतं- ह.भ.प.रामराव महाराज ढोक ,आ.सुरेशकुमार जेथलिया आयोजित रामकथेस भाविकांची मोठ्या संख्येने उपस्तिथी.

Image
परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण      रामायणाच्या मुळाशी काम क्रोध मत्सर आदी विचारांना तीळजळी देऊन निस्सिम भक्ती तत्व निष्ठा आणि सहकार्याची भावना जोपासण्याची सवय दिसून येते हनुमानाची भक्ती आणि सीतेचे शोधार्थ,अत्याचारी रावणाच्या लंकेपर्यंत जाऊन अत्याचारी विरुद्ध लढण्याचं बळ रामायणातून मिळत असं ह भ प रामानेचार्य रामराव महाराज ढोक यांनी आजच्या लंका दहन या कथाप्रसंगी सांगितले            मा आ सुरेश कुमार जेथलिया आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ च्या सहाव्या दिवशी निरोप करतानी ह भ प रामराव महाराज ढोक बोलत होते          कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह माजी मंत्री तथा आमदार बबनरावजी लोणीकर,खासदार संजय उर्फ बंडू जाधव , माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए जे बोराडे,पाटील पंडितराव भुतेकर,मोहनजी अग्रवाल, विजय राठी,कांतीलालजी होलानी...

छत्रपतींचा, साधुसंतांचा अपमान सहन केला जाणार नाही - आमदार लोणीकर,साधू संतांविषयी विधान करताना तारतम्य बाळगा.. अन्यथा गंभीर परिणाम - आमदार लोणीकर,संत गजानन महाराजांच्या कृपेने दिंडी मार्ग पूर्ण होऊ शकला- माजी मंत्री, आमदार लोणीकर

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण         महाराष्ट्र व देशभरातून कष्टकरी शेतकरी कामगार डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक नेते कार्यकर्ते आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे याकरिता एक महिनाभर दिंडी सोहळ्यामध्ये पायी चालतात. जगभरात असा दिंडी सोहळा कुठेही नाही. जालना जिल्ह्यात संत गजानन महाराजांच्या दिंडीला पंढरपूरहून शेगाव कडे परत जाताना अपघात झाला होता. या अपघातात वारकऱ्यांचे मृत्यू झाले होते. जालना जिल्ह्याला हा काळा डाग लागला होता. संत गजानन महाराजांना आपल्या भाविक भक्तांची काळजी असल्याने संत गजानन महाराजांच्या कृपेने मला मंत्री पदाची संधी मिळाली त्यामुळे माझ्याकडून चारशे किलोमीटरचा शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग पूर्ण होऊ शकला. असे प्रतिपादन परमार्थ आश्रम सोयंजना तालुका परतुर जिल्हा जालना येथे संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ह.भ.प. पंढरीनाथ महाराज भाकड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या सोहळ्यात मराठवाडा वॉटर ग्रीड योजने चे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री बबनराव लोणीकर साहेब यांनी केले. राज...

कोरोना काळात गोरगरीब सामान्य जनतेचे जीव वाचवण्यात डॉक्टर प्रफुल्ल पाटलांचे महत्त्वाचे योगदान डॉक्टर प्रफुल्ल पाटलांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात घेतली भरारी - आमदार लोणीकर

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण  दिनांक 12 फेब्रुवारी 2023    विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करत शासकीय प्रशासकीय राजकीय उद्योग क्षेत्रामध्ये झेप घ्यावी असे प्रतिपादन माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. ते परभणी येथे आयोजित धन्वंतरी सोशल अँड कल्चरल फाउंडेशन परभणीच्या 25 वर्षे सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर आमदार संदीपजी धुर्वे माजी आमदार शोभा अनंतराव देवसरकर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष आंबट जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव जिल्हा उपाध्यक्ष माधवराव चव्हाण भाजपा जेष्ठ नेते नागोराव कदम मानवत ह भ प राम महाराज काजळे ह भ प बंडु महाराज धर्मे ह भ प बबरूवान महाराज शेंडगे ह भ प उद्धव महाराज भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ सभापती राजेश मोरे डॉक्टर विद्या पाटील श्रीमती श्रीकांत पाटील सुभाषराव मस्के डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर जयश्री बेडसे पाटील सौ...

भारतीय संस्कृतीची शाश्वत मूल्ये रामायणात -हभप ढोक महाराज,मा.आ.सुरेशकुमार जेथलिया आयोजित रामकथेस भाविकांची मोठ्या संख्येने उपस्तिथी.

Image
परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण      रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली असून, प्रभाव संपूर्ण जगात पसरला आहे. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र आहेत. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती,या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जात असल्याचे त्रेतायुगात श्रीविष्णू आपला सातवा रामवतार धारण केला. राम हा विष्णूचा अवतार होता, त्याचप्रमाणे राम पत्नी सीता ही लक्ष्मी देवीचा अंश होती, असे मानले जाते. देवाचा अवतार असूनही रामाला वनवास चुकला नाही. सीताही रामासोबत चौदा वर्षे वनवासाला गेली. मात्र, वनवासाची काही वर्षेच शिल्लक राहिली असताना रावण सीताहरण करतो असे रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले मा आ. सुरेशकुमार जेथलिया व परिवाराच्या वतीने आयोजित रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून सांगितल्या जाणार्‍या श्रीर...

परतूर गवळी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा नांदेड चे अध्यक्ष नंदकिशोर लुले यांचा सत्कार

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण       गवळी समाज नांदेड चे अध्यक्ष नंदकिशोर लुले (आयकर अधिकारी नांदेड)यांनी नांदेड येथील वीरशैव गवळी समाजाचा दि. 10 रोजी सामूहिक विवाह सोहळा यशस्वी रित्या पार पडल्या बद्दल परतूर गवळी समाज बांधवांच्या सत्कार करण्यात आला. लग्न समारंभात होणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मागील अठरा वर्षांपासून गवळी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन होत असते   परतूर गवळी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा नांदेड चे अध्यक्ष नंदकिशोर लुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परतूर गवळी समाजाचे अध्यक्ष रमाकांत बरीदे, चंद्रकांत बल्लमखाने, नंदकिशोर बल्लमखाने अदि दिसत आहेत  या मध्ये समाजातील अनेक डॉक्टर,वकील सह प्रसिद्ध व्यापारी यांचे पण लग्न पार पाडतात पण मागील करोना च्या दोन वर्षांच्या काळात हा विवाह सोहळा झाला नव्हता पण या वर्षी हा विवाह सोहळा नांदेड येथे आयोजित केला होता या वेळी समाजातील अठरा जोडप्याची लग्न झाली याच अनुषंगाने आज परतूर येथील समाज बांधव यांच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा समिती नांदेड चे अध्यक्...

चार वर्षापासून रखडलेल्या परतूरच्या सिंचन विहिरीचा प्रश्न मार्गी लागणार- ना.संदिपान भुमरे,पत्रकार रशीद बागवान यांनी मांडली शेतकऱ्यांची कैफियत

Image
    परतूर/ प्रतिनिधी हनुमंत दवंडे        महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी योजना असलेल्या अहिल्याबाई होळकर सिंचन विहीर योजनेला जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात गाळबोट लागले असून गेल्या चार वर्षापासून ही योजना तालुक्यात बंद पडली आहे. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त विहिरीचे वाटप झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेत गोंधळ करण्यात आला होता. मात्र आता याचा आधार घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी ही योजना तब्बल चार वर्षापासून बंद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत.आज राज्याचे रोहयोमंत्री ना.संदिपान भुमरे हे परतुर दौऱ्यावर आले असताना पत्रकार संघाच्यावतीने रशीद बागवान यांच्यासह अनेकांनी तालुक्यातील विहिरींचा विषय मांडला असता ना.भुमरे यांनी त्यासंबंधी जिल्हास्तरीय बैठक घेऊन तात्काळ ही योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले.यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.         याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यात चालू असलेली अहिल्याबाई होळकर धडक विहीर योजन...

बंधु प्रेमासाठी राज्य त्याग करणार्‍या भरताचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा- ह.भ.प. रामराव महाराज ढोक

Image
  परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण        बंधू प्रेमासाठी रामाने राज्य सोडले भरताने राज्यपद व आपण मात्र एकमेकांविरुद्ध वेगळ्या दिशेने वागतो एखादी घटना मनाविरुद्ध घडली तर अनेकांच्या घरी कलह निर्माण होतो मिथिलेच्या राजा ची कन्या विश्वाच्या राजा ची पत्नी १४ वर्ष वनवासात कशी राहिली हेच आपण शिकले पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प. रामराव महाराज ढोक यानी केले गरिबांना मदत दानधर्म, गुरुमाता पिताचा सम्मान व आईची सेवा केल्यास आपल्याला निश्चितच आपल जीवन सार्थक झाल्या सारखे वाटेल असे ही ते म्हणाले मा. आ. सुरेशकुमार जयलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथील अयोध्या नगरीत सुरु असलेल्या रामकथेच्या चौथ्या दिवशी ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी राम वनवासात जात असतानाचे वर्णन सदर्भासह इष्टांत देऊन विशद केले. या वेळी भाविक मंत्रमुग्ध होऊन कथा श्रवण करताना दिसत होते.   " उठा जागे व्हावे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माची" या संत नामदेव महाराजांच्या अभंगावर ढोक महाराजांनी या वेळी चिंतन मांडले. महाराज म्हणाले, जन्माला येणार्‍या...