Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी येथील सकल मराठा समाज बांधवाचे साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात

Image
तिनिधी | तळणी( रवि पाटील)    मंठा तालूक्यातील तळणी येथे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली होती याच साखळी उपोषणाचे रुपांतर आज मंगळवार पासून आमरण उपोषणात करण्यात आले आहे नानासाहेब खंदारे याच्या नेतृत्वात हे आमरण उपोषण आज पासून सुरू करण्यात आले तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग या उपोषणात राहणार आहे अंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या . मराठा आरक्षणाच्या या लढाई ला व मनोज जरांगे याना पाठबळ मिळावे या हेतुने सकल मराठा समाज या आंदोलनात सक्रीय झाला असल्याचे उपस्थित मराठा बांधवानी सांगीतले आहे तळणी परीसरातील तळणी वडगाव शिरपूर कोकंरबा देवठाणा उस्वद कानडी इंचा टाकळखोपा वाघाळा लिबंखेडा दुधा सासखेडा किर्ला हनवतखेडा व आणखी अन्य गावांचा सहभाग या साखळी उपोषणाला राहणार आहे सुरवातीला छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे एक मराठा कोटी मराठाच्या जयघोषाने बस स्टँन्ड परीसर दुमदुमून गेला   या आमरण उपोषणा सदर्भात जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले आहे  काल सोमवार रोजी मंठ...

सील्लोड तहसील येथील पेशकर वीकास तुपारे यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले

 जालना प्रतीनीधी समधान खरात  सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून (पेशकर) वीकास तुपारे यांना वाळूचे ट्रॅक्टर सोडण्या करीता वीस हज्जाराची लाच स्वीकारताना रंगहाथे पकडले    सील्लोड येथील तक्रारदार यांचे दि.२७ ऑक्टोबर रोजी वाळू वाहतूक करताना टॅक्टर तलाठी जाधव यांनी पकडून तहसील त्याचा अहवाल तहसील कार्यालय सिल्लोड येथे सादर केले होते या अहवाला वर कार्यवाही होऊ नये या करीता सिल्लोड येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून (पेशकर) यांनी तक्रारदार यांना सत्तर हजार रू लाच स्वरूपात तहसीलदार यांच्या साठी चाळीस हजार तलाठी यांच्या साठी वीस हजार व स्वता साठी दहा हजार आसे एकूण सत्तर हजाराची मागणी केली तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नव्हती तक्रारदार यांनी त्या वेळेस तीस हजार रु दिले व उर्वरित नंतर देण्याचे ठरले          ठरल्या प्रमाणे वीकास तुपारे यांनी राहीलेले चाळीस हजार रु घेऊन दि ३० ऑक्टोबर रोजी बोलवीले    तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्या मुळे त्यांनी लाचलूयपत प्रतीबंधक वीभाग येथे संपर्क साधून...

तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग , साखळी उपोषण सुरु

Image
तळणी रवि पाटील    मंठा तालूक्यातील तळणी येथे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग या साखळी उपोषणात राहणार आहे अंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या . मराठा आरक्षणाच्या या लढाई ला व मनोज जरांगे याना पाठबळ मिळावे या हेतुने सकल मराठा समाज या आंदोलनात सक्रीय झाला असल्याचे उपस्थित मराठा बांधवानी सांगीतले आहे तळणी परीसरातील तळणी वडगाव शिरपूर कोकंरबा देवठाणा उस्वद कानडी इंचा टाकळखोपा वाघाळा लिबंखेडा दुधा सासखेडा किर्ला हनवतखेडा व आणखी अन्य गावांचा सहभाग या साखळी उपोषणाला राहणार आहे सुरवातीला छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे एक मराठा कोटी मराठाच्या जयघोषाने बस स्टँन्ड परीसर दुमदुमून गेला   या साखळी उपोषणा सदर्भात मंठा तहसील दार पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले आहे  मराठा समाजाला जोपर्यन्त आरक्षण मिळत नाही तोपर्यन्त गावामध्ये सर्वपक्षीय नेत्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे तसा ठराव ग्रामपंचातीने घेतला आहे सकल मराठा समाज...

मोठी स्वप्ने पहा आणि परिश्रम करून पूर्ण करा '- पोलीस निरीक्षक एम . टी. सुरवसे .

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  आनंद इंग्लिश स्कूल परतुर येथे विद्यार्थी प्रतिकृती प्रदर्शन संपन्न झाले. याचे उदघाटन पोलीस निरीक्षक मा.एम.टी. सुरवसे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स मनोहर खालापुरे व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मा.सुरवसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लहान वयातच मोठी स्वप्ने पहावीत , मोठे झाल्यावर काय व्हायचे ते आत्ताच निश्चित करून परिश्रम सुरू करावेत. निश्चित यशस्वी व्हाल .  प्रमुख पाहुणे  मनोहर खालापुरे यांनी शाळेत मिळत गुणवत्तापूर्ण शिक्षण व इतर उपक्रमा मुळे शाळेचे मोठे नाव झाल्याचे सांगितले. भविष्यातील अनेक यशस्वी विद्यार्थी शाळेतून घडविल्या जातील. प्रदर्शना च्या आयोजन बद्दल शिक्षक व पालक यांचे कौतुक केले.  संस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी संस्थेद्वारे सुरू झालेल्या ज्युनिअर कॉलेज ची माहिती दिली. स्वतःच्या हातांनी केलेली कृती विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहते त्यामुळे पालकांची विद्यार्थ्यांना कृती करण्यास वाव द्यावा असे सांगितले.  या प्रदर्शनात विद्य...

तुकाराम गणाजी दवंडे यांचे हृदय विकाराने निधन

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतूर तालुक्यातील येणोरा येथील तुकाराम गणाजी दवंडे यांचे दि 26 आक्टोबर 2023 गुरुवारी दुपारी साडेचार वाजता  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.   मृत्यू समयी ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, चार मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे व मोठा परिवार आहे. पत्रकार हनुमंत दवंडे यांचे ते वडील होत.

जालना पोलिसांनी सुमित बिजर बार मालकाच्या घरातून दोन धारदार तलवारी जप्त केल्या

जालना प्रतिनिधी समाधान खरात     पोलीस स्टेशन सदर बाजार जालना हद्दीत दिनांक 25.10.2023 रोजी  बेकायदेशिरित्या घातक शस्त्र तलवारी  जप्त करण्यात आल्या    गुप्त खबऱ्यामार्फतसदर बाजार पोलीसांना  माहिती मिळाली कि, जालना शहरातील सुमित बिअर बार मालकाचे घरात विना परवाना बेकायदेशिरित्या घातक शस्त्र तलवारी घरात ठेवलेल्या आहेत." अशी गोपनीय माहिती मिळाल्या नंतर   पो.नि. प्रशांत महाजन व डि.बी. स्टाप चे प्रमुख पो.हे.का. रंगे, पो.हे.का.  जाधव, पो.हे.का.  उबाळे, महिला पो.हे.का बोडखे, पो. का. , पो.का.  यांनी पंचाना करून  सुमित बिजर बार येथे आले. सुमित बिअर बारची व पहिल्या मजल्यावरील घराची पंचासमक्ष झडती घेतली असता घराचे हॉलच्या पाठीमागील रुम मध्ये अंदाजे कि. 12,000/-रु. च्या दोन धारदार तलवारी म्यान सह मिळून आल्या. त्यापंचासमक्ष जप्त करण्यात आल्या असून बिअर बाल मालक सुमित राजेश कपुर वय 25 वर्ष रा. जे.ई.एम. कॉलेज रोड, जालना यांचेवर कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.का. पवार हे करीत आहेत...

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

Image
 प्रतीनीधी समाधान खरात  ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.  जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केल . दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.  बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतच...