Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर -मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडा,.आ.सुरेश जेथलिया यांचे विरोधी पक्ष नेते मा.वीजय वडेट्टीवर यांना साकडे

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात    जिल्हात दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा आणि शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  ही पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयजी वडेट्टीवार हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते.  तसेच परतूर व मंठा तालुक्यात देखील अवकाळी पाऊसाने कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून देखील परतूर -मंठा तालुके शासनाने अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त तालुक्यातुन वगळले असून त्या तालुक्यांचा देखील सहभाग करण्यात यावा या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवावा या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना मा. आ. सुरेश जेथलिया यांनी निवेदन देत मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्यान देण्याची विनंती केली. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

कोल्हापूरी बंधाऱ्याचे रूपांतर उच्च पातळी बंधाऱ्यात करण्यासाठी तळणी येथे दि.३० नोव्ह. रोजी रास्ता रोको

Image
तळणी : . प्रतिनिधी ( रवि पाटील ) तळणी परीसराची जीवनदाईनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्णा नदीपात्रावरील कोल्हापूरी बंधार्याचे उच्च पातळी बंधार्‍यात रुपांतर करण्यासाठी तळणी येथे किशोर खंदारे याच्या नेतृत्वाखाली दि ३० नोव्हबर गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पूर्णा नदी पाञातील वाघाळा इंचा व देवठाणा उस्वद या तीन ठिकाणचे कोल्हापूरी बंधाऱ्यचा बाजूचा भराव आतिवृष्टीत वाहून गेला आहे यामुळे या बंधार्यात एक थेबं सुध्दा पाणी अडवल्या जात नाही या तिनही ठिकाणची हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येऊ शकते उस्वद देवठाणा येथील बंधार्याचे दोन वेळा दुरुस्तीचे काम केले तरी परीस्थीती जैसे थै आहे वाघाळा पूर्णा पाटी (ईचा ) व देवठाणा येथील कोल्हापूरी बंधार्याच्या बाजूच्या शेतकर्याच्या जमीनी पूर्ण पूणे खरडून गेल्या आहेत या बंधार्यामुळे उस्वद देवठाणा कानडी तळणी हानवतखेडा लिबंखेडा ईचा सासखेडा टाकळखोपा वाघाळा दुधा किर्ला या बारा गावांना या बंधार्याचा फायदा होईल वाघाळा येथील बंधारा हा पंधरा वर्षापासुन नांदुरुस्त आहे पूर्णा पाटी ईचा येथील बंधारा चार पाच वर्षापासून तर देवठाणा उस्वद येथील बंधारा गेल्या द...

आष्टी या माझ्या कर्मभूमीमध्ये, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देता आले हे माझे सौभाग्य- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण जनतेच्या आरोग्याची काळजी घेताना, आयुष्यमान भारत योजने अंतर्गत गोल्डन कार्ड, उपलब्ध करून दिल्याने सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते आष्टी ता परतूर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते  पुढे बोलताना ते म्हणाले की, उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आपण मंत्री असताना समाधान शिबिर घेतले होते जालना जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी उज्वला गॅस योजनेचा फायदा घेण्यासाठी पुढे यावे असे ही या वेळी बोलताना सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आष्टी गावाला शुद्ध पिण्याचे पाणी सोडण्याचे भाग्य मला लाभले याचा मला मनस्वी आनंद असून, ज्या गावां पासून मी माझा राजकीय प्रवास सुरू केला त्या गावाला आज मी पाणी देऊ शकलो याचा मला अभिमान असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना...

परतुर येथे श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा आयोजनाची रविवारी बैठक

Image
परतुर प्रतिनिधी  कैलाश चव्हाण  श्रीराम जन्मभुमी मंदिर व शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी आयोजनाची बैठक परतूर येथे रविवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य श्रीराम जन्मभुमी मंदिर पुर्णत्वाकडे जात आहे. दि 22 जानेवारी 2024 मध्ये ते पुर्ण होवुन रामलल्लाची मुर्ती त्याठिकाणी विराजमान होणार आहे. हा सर्वच हिंदुसाठी आनंदाचा क्षण आहे. तसेच परकीय आक्रमण परतवुन हिंदुचा  सार्वभौम राजा म्हणुन छत्रपती शिवरायाचा "शिवराज्याभिषेक सोहळा  झाला. या घटनेस 6 जुन 2024 रोजी 350 वर्ष पुर्ण होत आहे. या आनंदाच्या क्षणाचा आनंदोत्सव कसा साजरा करायचा याबाबत प्रत्येक हिंदु बांधवापर्यंत श्रीराम जन्मभुमी निर्माण न्यास समितीतर्फ देण्यास आलेल्या अक्षता पोहचविण्याच काम स्वयंसेवक करणार आहेत. दोन्ही आनंदमयी क्षणात जास्तीत जास्त हिंदुबांधवाचा सहभागी व्हावे. यासाठी तालुक्यातील स्वयंसेवक, बजरंगी, हिंदुत्ववादी संलग्न संघटन...

परतूर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण      परतूर येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे गेल्या पाच वर्षापासून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, परतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांच्या रुग्णालयाचा दर्जा परतूर ग्रामीण रुग्णालयाला मिळाला असून, यामुळे ग्रामीण भागातील जालना परभणी कडे जाणाऱ्या गंभीर रुग्णांना परतूर शहरातच उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होणार आहेत अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे  पुढे या पत्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, परतूर येथे या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, परतूर तालुक्यातून व शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जालना परभणी नांदेड हा एक महामार्ग असून दुसरा महत्त्वपूर्ण शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग असल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात त...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश सचिव पदी शिवाजी भालेकर यांची नियुक्ती.

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभागाच्या "प्रदेश सचिव" पदी श्री शिवाजी भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आहे . नियुक्ती पत्र आ.रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आले. शिवाजी भालेकर हे पक्ष बळकटीसाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षांची ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवत असतात. आणि त्यांचा या पक्षावरील बांधिलकी व कटूब्ध विश्र्वास पाहता त्यांना हे पद देण्यात आले आहे. तसेच त्यांनी पक्ष वाढीसाठी व पक्षाला बळकटी आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करावेत असे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

नायब तहसील दार विनोद भालेराव यांचा युवासेना च्या वत्तीने सत्कार

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण   परतूर येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विनोद भालेराव यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला    परतूर येथे तहसील कार्यालय मधे नायब तहसीलदार यांचे पद रिक्त होते त्या जागी रिक्त जागी नायब तहसीलदार विनोद भालेराव यांनी पद्भार घेतला असून त्यांचा परतूर तालूका युवा सेना प्रमुख अविनाश कापसे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या वेळी तहसील येथील कर्मचारी पेशकर संतोष पवार,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनील सींगाडे, दंडेवार , हेलग,ड इतर कर्मचारी उपस्थीत होते