Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आ.गायकवाड यांच्या विरोधात परतूर कॉग्रेस च्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण मुख्यमंत्र्यांची लाडकी पिलावळ सातत्याने वाचाळवीरा सारखे चिथावणी खोर वक्तव्य करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं ज्यांच काम आहे तेच सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते खा.राहुलजी गांधी यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार संजय गायकवाड यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे      आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत आमदार संजय गायकवाड यांच्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन परतुर पोलीस स्टेशनला दिले.     यावेळी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नीतीन जेथलीया अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष बालासाहेब अंबिरे,तालुकाध्यक्ष,बाबाजी गाडगे,इंद्रजित घनवट,आशिषजी जेथलिया,सुरेश सवणे, बाबुरावजी हिवाळे, रेहमुशेठ कुरेशी,लक्ष्मण शिंदे,दत्तराव अंभुरे, गणेश ढवळे,लक्ष्मण खोत,शिदू अंभुरे,अंकुश आढे,अनंता भारसाखले,दत्तराव पवार, रफिक कुरेशी,फेरोझ बागवान, दत्ता गाडगे यांच्यासाह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत...

टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप सांस्कृतिक परंपरा जपत "तरुण" गणेश मंडळ गोळेगाव च्या आकर्षक मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष...

Image
आष्टी प्रतीनिधी  गाळेगाव येथे टाळ मृदगाच्या गजरात पारंपारिक पद्धतीने बप्पाचे विसर्जन करण्यात आले   सध्या च्या काळात कर्कश डि.जे. आणि डोळ्यांना इजा पोहोचणाऱ्या लेझर किरणांचा सर्रास वापर कुठल्याही कार्यक्रमात आत्ता सर्वसाधारण झाला आहे,परंतु या सर्व बाबींना फाटा देत परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील मानाचा समजला जाणारा तरुण गणेश मंडळ या सर्वांना अपवाद ठरला आहे.    टाळ मृदंगाच्या गजरात आणि सुमधुर अभंगाच्या  संगीतात गावातील मुख्य रस्त्याने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली,रस्त्याच्या दुतर्फा महिला मंडळींनी रांगोळी काढत वारकऱ्यांचे औक्षण केले.विशेष म्हणजे या मिरवणुकीत नवीन पिढीतील तरुणांचा गळ्यात टाळ घेत, विशेष सहभाग जाणवला यामुळे तरुणांच्या मनात नक्कीच पारंपरिक भक्तिभाव रुजेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष श्री. गंगाधर दगडू कांडुरे यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षी देखील अशीच हरी नामाची परंपरा कायम राहो, विविध प्रकारच्या पारंपरिक कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी बाप्पा बळ देवो असा विश्वास व्यक्त करत बाप्पांना जड अंतःकरणाने पवित्र अश्या गोदावरी नदीत विसर्...

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावा-गावातून स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला- पालकमंत्री अतुल सावे

    जालना प्रतिनिधी नरेश अन्ना  दि. 17 सष्टेबर  मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या बंधनातून मुक्त करुन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभारण्यात आला होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावा-गावातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.          मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल‍ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अ...