Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

होमी भाभा परिक्षेत विवेकानंद इंग्लिश स्कूल व विवेकानंद पब्लिक स्कूल चे यश

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या होमी भाभा परिक्षेत विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी इ. ०९ वी व ०६ चे अनुक्रमे १९ विद्यार्थी, १९ विद्यार्थी पास झाले असून ०९ वी तून कु. शरयू चंद्रशेखर भांडवलकर तर इ. ०६ वी तून कु. आदित्री प्रमोद आकात व चि. हर्ष जगन्नाथ बागल यांची पुढील प्रात्यक्षिक फेरी साठी निवड झाली आहे. तसेच विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर ची इ. ०६ वी विद्यार्थीनी कु. इश्वरी गणेश उबाळे ही विद्यार्थिनी पास झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष डॉ. एस. जी. बाहेकर यांनी केले तर शालेय समिती अध्यक्ष श्री. संदीप  बाहेकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.