Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी केशव खटिंग यांच्या हस्ते...लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे बुधवारी उदघाट्न

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दि. 20 - येथील मोंढा भागातील शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयात बुधवारी (दि. 22) वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून परभणी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी केशव खटिंग यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.तर मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल  आकात हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती मुख्याध्यापक एल. के बिरादार यांनी दिली.     विद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11:00 वाजता आयोजित या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहून म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष कुणाल  आकात, लालबहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे, निवृत्त प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे, पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे हे उपस्थित राहणार आहेत.    कार्यक्रमाला पालक, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक एल. के. बिरादार, पर्यवेक्षक आर. टी. राऊत, टी. जी. घुगे यांनी केले आहे.     लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे स्नेहसंमेलन हे प...

खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते एल.के. बिरादार लाबशा विद्यालयात क्रीडा स्पर्धाचे उदघाट्न

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण परतूर, दि. 17 - खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज कुठला ना कुठला खेळ खेळला पाहिजे असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांनी केले.        येथील शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारपासून क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे उदघाट्न मुख्याध्यापक बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात उदघाट्क म्हणून ते बोलत होते. पर्यवेक्षक राजकुमार राऊत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून द्रौपदाबाई आकात इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिलजा मॅडम, त्र्यंबक घुगे, दत्तात्रय आकात, हरिओम कोरके, दिनकर सालगावकर,अरुण वावरे,रामराव पवार,किरण गवई इतरांची उपस्थिती होती.     बिरादार पुढे म्हणाले की, खेळाचे मानवी जीवनात मोठे स्थान आहे. खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.खेळण्यामुळे शरीर निरोगी तर मन प्रफुल्लित राहते असेही बिरादार म्हणाले. याप्रसंगी राजकुमार राऊत यांनीही ...