सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी यांनी मांडल्या पाडेवार यांच्या कडे व्यथा


परतुर प्रतिनिधी -  जालना जिल्ह्यातील परतुर नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी यांनी सोमवार रोजी विविध समस्या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार अर्जुन पाडेवार यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
    सध्या गेल्या सहा महिन्यापासून कोरोना रोगामुळे सर्व सामान्य जनता हैरान असुन या कठीण  काळामध्ये नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी यांनी पुर्ण परतुर शहरातील साफसफाई साठी मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच काँट्रॅक्ट दार यांनी महीण्याच्या १ तारखेला चा पगार करावी  महिन्याच्या महिन्याला पगार केली तर चागले होईल, पगार वेळीच  झाले नाही तर गोरगरीब कर्मचारी यांना उसनवारी करून मुलाबाळांचे पोट भरावे लागत आहे,. अनेक कर्मचारी नगरपालिकेत गेल्या तिस वर्षापासुन आपली सेवा बजावत आहेत, या मध्ये अनेक कर्मचारी कायमस्वरूपी होण्याची वाट पाहून मयत सुध्दा  झाले आहे. जे कर्मचारी मयत झाले आहे त्यांच्या जागी बदलीवर त्यांच्या वारसाला कामावर घेण्यात यावे, जे कर्मचारी आपली सेवा बजावित असतांनाच आजारी पडले आहेत त्यांच्या बद्दल्यात त्याच्यां च  वारसाला कामावर घ्यावे, तसेच काँट्रॅक्ट दारांनी लावलेला मुकादम कामावर येणार्या कर्मचारी यांना थोडा ऊसिर झाला की दमदाटी करत आहे, जुने कर्मचारी यांना तात्काळ कायमस्वरूपी करण्यासाठी अर्जुन पाडेवार यांनी स्वाता पुढाकार घ्यावा या सह अनेक मागण्या सफाई कर्मचारी यांनी अर्जुन पाडेवार यांच्या कडे मांडल्या आहेत, यावेळी लवकरच या संदर्भात नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विमलताई जेथलीया, मुख्याधिकारी गवळी यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पाडेवार यांनी  नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी यांना दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत