सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

युवा मोर्चा पुढे सरकार नमले, लवकरच जिम सूरू होणार- राहुल लोणिकर


परतूर (प्रतिनिधी) राज्यसरकार युवा मोर्च्या च्या दबावाला झुकले असून लवकरच जिम आणि व्यायामशाळा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे
   या संदर्भात राज्याचे भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील भाजयुमो प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटली होती यावेळी या शिष्टमंडळाने युवकांसाठी व्यायाम शाळा सुरू कराव्यात असी मागणी केलं होती या संदर्भात युवा मोर्चा ने आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याचा इशारा देताच सरकार नरमले असून लवकरच राज्यातील जिम व व्यायामशाळा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
     या संदर्भात भा ज यु मो प्रदेश सरचिटणीस  राहुल लोणीकर यांनी लवकरच जिम आणि व्यायामशाळा सुरू होणार असल्याचे सांगतानाच राज्याचे सरकार अखेर युववर्गा च्या प्रश्नावर झुकले असल्याचे राहुल लोणीकर यांनी म्हंटले आहे
        राज्यात दारू ची दुकाने सुरू झाली मात्र मंदिरे, व्यायामशाळा बंद होत्या त्या मुळे युवा वर्गात मोठी नाराजी होती मात्र सरकार या विषयावर गंभीर नसल्याने युवा मोर्च्या च्या शिष्ट मंडळाने नुकतीच राज्यपालांची भेट घेऊन युवक व मराठवाड्यातील शेतकऱ्यां च्या मागण्या राज्यपालां पुढे मांडल्या होत्या या पार्श्वभूमीवर राज्याच्या सरकारने व्यायामशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच व्यायामशाळा सुरू होणार आहेत असे ही राहुल लोणीकर यांनी म्हंटले असून, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाल्या शिवाय आपण गप्प बसणार नसून, सरकार जो पर्यंत विना अट शेतकऱ्याना मदत देत नाही तो पर्यंत आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले
     शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी लवकरच मोठे आंदोलन मराठवाडयात युवा मोर्चा उभे करणार असल्याचे ही त्यांनी म्हंटले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत