सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

घनसावंगी तालुका भाजयु मोर्चा च्या सरचिटणीसपदी राम खांडे


घनसावंगी( प्रतिनिधी )
घनसावंगी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा पक्षाच्या तालुका सरचिटणीसपदी  तालुक्यातील म चिचोली येथील पक्षाचे क्रियाशील व सक्रिय युवा कार्यकर्ते राम खांडे यांची निवड करण्यात आली . या निवडी बाबतचे पत्र  माजी मंत्री  तथा आमदार बबनराव लोणीकर, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शना खाली   युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुजित जोगस यांनी निवड केली या प्रसंगि  माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती सर्जेराव जाधव , यांनी शूभेच्छा दिल्या भाजपा  किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे , भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शिवराजभैया नारियलवाले , भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश तौर , भाजपा युवा मोर्चा जि.उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,भाजपा युवा मोर्चा चिटणीस रामेश्वर सोळंके , विनोद दळवी , रफिक  उपस्थित होते   खांडे यांनी निवडी योग्य ते न्याय मिळवून देऊ आसे आपले मत व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत