सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रुपये 7 हजार 478 लाभार्थयांच्या खत्यात जमा,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे वृध्द अपगांना मिळाले मानधन

 परतूर प्रतिनिधी - श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील 7  हजार 478 वृद्ध, अपंग, विधवा, निराधार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रु मानधन  जमा झाले असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वृद्ध,अपंग, निराधारांना मानधन सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी  विविध ठिकाणी कॅम्प लावून मिळावे घेऊन लाभार्थ्यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा केला होता त्यामुळे परतूर तालुक्यातील 7 हजार 478 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून लाभार्थ्यांकडून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धन्यवाद दिले जात आहे.
           
       परतूर तालुक्यामध्ये श्रावण बाळ योजनेचे अ गटातील लाभार्थी 2835 असून  त्यांना 65 लाख 63 हजार 700  तर ब गटामध्ये 90 लक्ष 90 हजार  रुपयाचे अनुदान जमा झाले आहे तर संजय गांधी योजने अंतर्गत 198  विधवा लाभार्थ्यांना 2 लाख 77 हजार 200  व अपंग लाभार्थ्यांना 1 लाख 56 हजार 800  तर  निराधार योजनेतील 1333  लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 26 लाख 66 हजार  रुपये मानधन जमा झाले आहे अशी माहिती   भाजपाच्यावतीने दिली आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत