सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

स्व.किशोर अग्रवाल यांना पत्रकारांची श्रध्दांजलीशहरातील चौकात पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार-विकासकुमार बागडी


जालना,दि.13 (प्रतिनिधी) रुपम ग्रुपचे चेअरमन, ज्येष्ठ समाजसेवक स्व. किशोर अग्रवाल यांना आज शनिवारी असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम न्यूज पेपर्सच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील हॉटेल मधुबन येथे झालेल्या शोक सभेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान, यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी म्हणाले की, स्व. किशोर अग्रवाल यांची समाजसेवा खर्‍याअर्थाने वाखण्याजोगी होती. गरिबांना मदत करणे हा त्यांचा छंद होता. लॉकडाऊनच्या कार्यकाळातही त्यांनी भरघोस अशी मदत केलेली आहे. त्यांची ही सेवा विसरण्याजोगी नाही.  त्यांच्या पासून इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणूनच त्यांची प्रतिमा शहरातील एखाद्या चौकात उभारुन त्या चौकाला स्व. किशोरसेठ अग्रवाल असे नाव देण्यात यावे, अशी आपण संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांसह सर्व संबंधितांकडे करणार असून तशा आशयाचे निवेदनही उद्या सोमवारी देणार असल्याचे यावेळी संंघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लियाकतअली खान यांनी केले. तर शोकसभेस रवि अग्रवाल, राम अग्रवाल यांच्यासह नरेश धारपवळे, मुकेश परमार, विजय जाधव, सिताराम तुपे, ईर्शाद शेख, दिनेश नंद, नदीम कुरेशी, अशपाक पटेल, सुनिल खरात, राहुल वाहुळे, संतोष भुतेकर, सोनाजी झेंडे, इलियास शेख अब्बास, दिपक शेळके, शहानवाज कुरेशी, मयूर अग्रवाल, मधुकर मुळे, धंनंजय देशमुख, रुख्मीणिकांत दिक्षीत आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत