सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

केंद्र सरकारच्या भाववाढीच्या विरोधात परतूर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागिय अधिकाऱ्यांना निवेदन

परतूर(प्रतीनीधी)  वाढत्या खतांच्या किमती व डिझेल पेट्रोल च्या दरवाढीविरोधात माजी आमदार सूरेशकुमाार जेथलीया यांच्या मार्गदर्शना खालि युवा नेते नितीन जेथलिया यांच्या नेतृत्वात परतूर काँग्रेस कमिटी च्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या व पेट्रोल, डिझेल दरवाढीचा जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेबजी गाडगे,जि.प.सदस्य इद्रंजीत घनवट,युवक अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे, उपनगराध्यक्ष सादेक भाई खतीब,बाजीराव खरात, नगरसेवक बाबुराव हिवाळे,राजेशजी भुजबळ,सिध्दार्थ बंड,तारेख सिध्दीकी,अविनाश शहाणे,मधूकर झरेकर,गोविंद वाशिंबे,मोसिन बागवान,पाडुरंग गाडगे ,मतीन कुरेशी, विकास झरेकर,उध्दव बोनगे इत्यादी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत