सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

भानुदासराव चव्हाण वरीष्ठ महाविद्यालयात लसीकरण शिबीर संपन्न


परतूर - दिनांक  29आक्टोबर 2021 रोजी येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग  व  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र मार्फत मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोव्हक्सिन लसीकरण कार्यक्रम यशस्वी पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. दिनकरराव चव्‍हाण  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्ञानदेव नवल (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, परतुर), 
डॉ. दीपक तारे (नोडल अधिकारी लसीकरण ग्रा. रुग्णालय परतुर) 
तसेच महाविद्यालयाचे संचालक मा. श्री. संतोष चव्हाण , प्राचार्य शंकर चव्हाण  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. प्रदीप चव्हाण, याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. लिंबाजी कदम ,श्री गजानन कास्तोडे  उपस्थित होते.

या प्रसंगी वैद्यकीय रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या लसीकरण शिबिरास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.  एकूण  63 व्यक्तींना लस देण्यात आली.
या लसीकरण कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे  प्रा. प्रदीप साळवे ,अक्षय कुरकुटे, विनोद भोसले, विजय पोलकमवड श्रीमती ककरीये, शिंगारे , लहाने ,प्रा. रवि गोरे  आदींसह महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत