सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा तालुक्यातील तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कंत्राटी भरती करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी


मंठा (सुभाष वायाळ)-दि.15 तळणी हे मंठा तालुक्यातील सर्वात शेवटचे विदर्भाच्या सिमेजवळील गाव असून या ठिकाणी आरोग्य सुविधांचा खूप मोठा अभाव आहे परिसरातील साधारणता ४० पेक्षा अधिक गावांची बाजारपेठ म्हणून तळणी या गावाकडे बघितले जाते  शासनाने खूप मोठा खर्च करत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिले आहे परंतु कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांची मोठी अडचण झाली आहे अशा परिस्थितीत कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करण्यात यावी. अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे

मागील पंचवार्षिक मध्ये लोणीकर यांनी स्वतः प्रयत्नपुर्वक तळणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत उभी राहिली आहे परंतु अद्याप पर्यंत त्या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही परिणामी परिसरातील नागरिकांची व रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे

परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या वापरण्यासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र उपलब्ध नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ६ उपकेंद्र अवलंबून आहेत त्यामध्ये वझर सरकटे, बेलोरा, देवठाणा ऊस्वद, शिरपूर व तळणी या उपकेंद्रांचा समावेश आहे औषधोपचारांसाठी दहिफळ खंदारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने मंजूर करून भव्य स्वरूपात उभारणी केले हे प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ शोभेची वस्तू बनणे योग्य नाही. असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे

या प्राथमिक आरोग्य केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी, १ सुपरवायझर, १ लॅब टेक्निशियन, १ आरोग्य निर्माता, ४ आरोग्य सेवक, २ आरोग्य सेविका, ३ शिपाई ही पदे तात्काळ भरण्यात आवश्यक आहे त्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करून परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल जिल्हाधिकार्‍यांना बरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यात लक्ष घालावे व कंत्राटी भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशी अपेक्षा लोणीकर यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत