सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दुःखाचं डोंगर बाजूला सारून राहुल लोणीकर थेट अपघात ग्रस्तांच्या मदतीला रस्त्यावर



परतूर(प्रतिनिधी)

घरातील एखादा कर्ता माणूस कायमच आपल्याला सोडून गेला तर त्याच दुःख कायम असतो आणि वेळोवेळी त्या वैक्तीच्या आठवण मनाच्या गाभाऱ्यात कायम राहत असते परंतु दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे वडील तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे आजोबा स्व.दत्तात्रय लोणीकर यांचे निधन झाले 
आणि तालुक्यासह राज्यभरातील नेते,कारकर्ते,मित्र परिवार,पक्षातील सहकारी, अन्य पक्षातील राजकीय मंडळी यांची सांत्वन पर भेटी सुरू असतांना तालुक्यातील शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर रोहिणा गावाजवळ  रात्री आठ वाजेच्या सुमारास एक अपघात झाला आणि माहिती मिळताक्षणी राहुल लोणीकर यांनी सहकारी कार्यकर्त्यांना सोबत तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने  अपघातग्रस्त जखमींना रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आणि या जखमींना वेळेत उपचार कसे करता येईल यासाठी स्वतः काळजी घेत आहेत या कार्याबद्दल राहुल लोणीकर व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचे जनसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत