सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

हातडी येथे युवा नेते नितीन जेथलीया यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवण्यात आलेल्या क्रीकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

 श्रीष्टी(प्रतीनीधी) हातडी येथे युवा नेते नितीन  जेथलिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित खुल्या टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धे चे बक्षिस वितरण युवा नेते नितीन  जेथलिया यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रथम पारितोषिक ता.अध्यक्ष बाबासाहेब गाडगे यांच्या वतीने ठेवण्यात आले होते 21111रुपये शंभूराजे परभणी संघाने पटकवले, दृतिय पारितोषिक इद्रंजीत  घनवट यांच्या वतीने होते15555 रुपये सावता इलेव्हन या संघाला तर  तृतीय पारितोषिक लक्ष्मण शिंदे यांच्या तर्फे 5555 रूपये   दैठणा इलेव्हन संघाने मिळवले  याप्रसंगि उपस्थित युवा नेते नितीन  जेथलिया,बाबासाहेब गाडगे,सुरेश  सवणे,शामसुंदर काळे, नगरसेवक बाबुराव हिवाळे,दत्ताभाऊ पवार,पाडुरंग गाडगे,गणेश ढवळे,हे उपस्थित होते 
            तर स्पर्धा यशस्वी करण्या करीता मुजांजी बोरकर, हरीदास बोरकर,संजय पाईकराव,गंगाधर बोरकर,हरीभाऊ झरेकर,कृष्णा झरेकर,जनार्दन बोरकर,संदिप बोरकर,कैलास बोरकर,दत्ता बोरकर,महेश बोरकर,आत्माराम बोरकर,शामभाऊ बोरकर,मारोती बोरकर,कमलाकर झरेकर,माणिक बोरकर,विलास बोरकर,आण्णा बोरकर,गोविंद बोरकर,देवेंद्र बोरकर,ज्ञानेश्वर झरेकर,सुभाष झरेकर,उमेश कदम,सातीराम बोरकर,मंगेश बोरकर अशोक खिल्लारे आदीनी परीश्रम घेतले  या वेळी संत सावता क्रिडा मंडळ ही उपस्थित होते या स्पर्धेचे विकास झरेकर यांनी यशस्वी रीत्या आयोजन केले होते 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत