सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणि येथे स्व गोपिनाथ मुंढे यांना अभिवादन

तळणि(रवी पाटील)स्व गोपीनाथ मुन्ढे याच्या जंयती निमित्य तळणी येथे तळणी सर्कल च्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी परतूर विधानसभा मंतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर  यानी गोपीनाथ मुंढे याच्या सहवासातील आठवणीना उजाळा दीला कठीण काळातून महाराष्ट्रात पक्षाला चांगले दीवस त्याच्या सघर्षातून मिळाले आहे पक्षातला त्याचा सहवास इतर कार्यकर्त्यना सहज घडत असे वंचित घटकाना न्याय मिळाला पाहीजे अशी आग्रही भूमिका त्यांची असायची ऊसतोड  कां मंगाराचा प्रश्न असो कीवा ओबीसी च्या प्रश्नानाचा विषय असो त्यासाठी त्याचे मोठे योगदान विसरता येणार नाही  पक्षात सुद्धा त्याना मान सन्मान मोठा होता त्याच्याच दुरदूष्ट्रीने साधारण कार्यकर्ता सुध्दा आज प समीती सदस्यापासून ते खासदारा पर्यन्त पोहोचला आहे सुरवातीच्या काळात निवडणूक हरल्यांनतर पुढच्या वेळेस आपण नक्की जिंकूि असा विश्वास व आधार त्यानी मला दिला त्यांचे मार्गदर्शन व सदीच्छा नेहमीच भाजपा कार्यकर्त्य सोबत असायच्या अशी प्रतीक्रीया आमदार बबनराव लोणीकंरांनी यावेळी व्यक्त केली यावेळी भाजपाचे गजानन देशमुख नितिन सरकटे केशव येऊल राजेश मोरे गणेशराव कापकर रामेश्वर सरकटे दत्तराव लाड  बबन दादा सरकटे आबासाहेब सरकटे व बहुसंख्य कार्यकर्त्य यावेळी उपस्थीत होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत