सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाणे एक कोटी 10 लाख रुपये चा फुल बांधून तयार .-पद्माकर कवडे



परतूर प्रतिनिधी/हनुमंतराव दवंडे
 वैजोडा. रोहिना खुर्द. रोहिना बुद्रुक. या गावातील धरणाच्या बॅक वॉटर मुळे 250 ते 300 एकर जमिनीला पडलेले बेट  पाण्याच्या वेडा. असल्यामुळे संबंधित गावातील शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी बेटावर जाता येत नव्हते. तत्कालीन पालकमंत्री आमदार बबनराव  लोणीकर. व राहुल  लोणीकर यांच्या यांच्याकडे हा विषय घेऊन. तत्कालीन पुनर्वसन समितीचे अध्यक्ष. स्व. उमाकांत  मानवतकर. पद्माकर कवडे. यांनी या बेटाची पाहणी करून हा विषय कानावर घातला.  तात्काळ लोणीकरानी या बेटावर जाण्यासाठी एक
 कोटी दहा लक्ष रुपये मंजूर करून दिले.  म्हणून या बेटावर जाण्यासाठी आता मार्ग सुकर झाला आहे. पूल बांधून तयार झाल्यामुळे संबंधित गावातील शेतकरी. वर्ग आनंदित झाले आहेत. गावातील शेतकऱ्याकडून आमदार बबनराव  लोणीकर व राहुल  लोणीकर यांचे  भुजंगराव कवडे. ज्ञानदेव शिंदे. गोविंद यादव. प्रकाश कवडे. परमेश्वर जाधव. रंगनाथ शिंदे. भगवान यादव. भाऊसाहेब खामकर. ओमप्रकाश दहिवाळ. अनिल दहिवाळ. राजेभाऊ शिंदे. नारायण खिंडकर विठ्ठल राव हिंगे. वसंत गवळी. प्रकाश राव भामट. गणेश गवळी. प्रभाकर मस्के. बालासाहेब भोपाळ. नामदेव शिंदे. सदाशिव शिंदे. वैजनाथ यादव. रामभाऊ यादव. सोपान मैंद किसन कवडे. रामदास खिंडकर. विष्णुपंत डोणे . कुमार देव कुलकर्णी. आधी शेतकऱ्यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत