सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

येणारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली..


परतूर प्रतीनिधी/हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील येनोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली.
ज्या शूर माता- पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही स्मरण केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे हीच कृतज्ञतेची भावना आहे. राष्ट्रातील या महान राजमाता लोकमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधन आहे.
असे यावेळी बोलताना भागवत  भूंबर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 यावेळी रमेश भाऊ भुंबर,नाथाभाऊ शिंदे,भागवतदादा भुंबर,भास्करराव साळवे, दिगंबर गायकवाड, अर्जुन मोरे, अशोक दवंडे,  पांडुरंग भुबर, वैष्णव भुबर कृष्णा तौर यावेळी उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत