सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

लालबहादूर शास्त्री खांडवी येथे 9 वी. आणि 10 वी च्या विद्यार्थ्याचे लसीकरण संपन्न...



परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील खांडवी येथे लालबहादूर शास्त्री हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गिरी मॅडम यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले आणि शाळेमध्ये   शाळेतील विद्यार्थ्यांचे एकूण 169 लसीकरण करण्यात आले .या वेळी शाळेच्या वतीने आरोग्य कर्मचारी व गावातील सरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गिरी मॅडम, खांडवी गवाचे सरपंच गणेशराव हा रकळ,  शाळेतील कर्मचारी श्री. कामठे सर , श्री. जोगदंड सर,श्री. चव्हाण सर, माकोडे सर, बरकुले सर , आरोग्य कर्मचारी वृंद श्रिष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे  बी.आर. तोटे , जी.बी. बुधवंत, श्री. आसाराम नागरगोजे, श्री प्रधान पी. एस . श्रीमती. वैद्य, एल. एस. आशा वर्कर श्रीमती, रेणुका पराडे , चंद्रकला चींचाने,तसेच गावातील पालक विश्वनाथ बरकुले ,श्री ,गोविंदराव बरकुले व,अनेक गावातील मंडळी या वेळी उपस्थित होती .

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत