सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दैठणा खु येथील शालेय व्यवस्थापन समितीचा सभापती कपिल आकात यांच्या हस्ते सत्कार


 
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 
तालुक्यातील दैठणा खुर्द येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवडी नंतर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांच्या हस्ते शालेय समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय सवने यांच्यासह नूतन कार्यकारणीचा सत्कार केला.
यामध्ये नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्ष विजय सवने, उपाध्यक्ष बालाजी नखाते, सदस्य शीतल सवने, इरफाना शेख, ब्रम्हानंद तायडे, अतिष गाडेकर, बिबनभाई शेख, रेणुका लिंगायत, सरिता सवने, सुनिता पाईकराव, सुरेश काटकर, सागर सवने यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल सत्कार प्रसंगी राष्ट्रवादीचे  बंडेराव सवने, शिवाजी सवने  सुरेशराव सवने, सरपंच सोनाजी गाडेकर, राजेश काटकर, महादेव सवने, दौलत सवने, रामा कचरे, दत्ता गाडेकर, पांडुरंग काटकर, बाळासाहेब ताठे लक्ष्मीकांत सवने, सुनील तायडे, शेख युनूस, शेख खमर, भगवान सोळंके, अशोक लिंगायत यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत