सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा तहसीलचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात


मंठा -(सुभाष वायाळ) दि.4 मंठा तालुक्यामध्ये रेती व गौण खनिजे उत्खनन हे अवैधरित्या चालूच आहे. रेती व गौण खनिजे प्रतिबंधक पथकाची कारवाई मात्र शून्य आहे. अवैध गौण खनिज व रेती यासाठी तहसीलच्याच अधिकारी व कर्मचारी यांचा हात असतो हे कालच्या दिनांक 3 रोजीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. मंठा येथे मुरमाचे टिपर व ट्रॅक्टर चालू ठेवण्यासाठी मंठा तहसील मधील कर्मचारी विठ्ठल पांडुरंग बोरकर वय 34 वर्ष ह.मु.संत तुकाराम नगर मंठा यांनी एकूण 26 हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे संपर्क साधून मंठा तहसील येथे सापळा रचला व तहसील मधील कर्मचारी यांना सव्वीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध दि.04.01.2022 रोजी गु.रं.न.4/2022 कलम 7व 7अ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस निरीक्षक एस.एस.ताटे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत