सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विद्यापीठ कायदे संदर्भात पारीत केलेले विधेयक हे काळे असून ते त्वरित मागे घ्यावे-- आ.बबनराव लोणीकर



मंठा(सुभाष वायाळ) पोस्ट ऑफिस कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने विद्यापीठ कायदा विषयक विधेयक चुकीचे असल्या कारणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी आणि रोष व्यक्त करण्यात आले.महाराष्ट्र सरकारने जे विद्यापीठाच्या संदर्भात विधेयक पारित केले आहे.हे विधेयक विद्यार्थ्याचा भविष्यात  राखरांगोळी  व घात करणारा आहे.घाई गडबडीत घेतलेले हे विधेयक  काळे असून शिक्षण प्रणालीला गालबोट लावणारे आहे.पारित केलेले विधेयक त्वरित  मागे घेण्यासाठी युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्याच्या पत्त्यावर  हजारो  पोस्टकार्ड  पाठवून  निषेध दर्शवला आहे.या कार्यक्रमाला युवा मोर्चाच्या विनंतीला मान देऊन आ. बबनरावजी लोणीकर यांनी उपस्थिती दर्शवली.
       लोणीकर यांनी बोलताना  हे पारित केलेले विधेयक काळे असून फक्त आणि फक्त वसुली,घोटाळे आणि हुकूमशाही  करण्याचा मानस या सरकारचा या मध्ये आहे. महाराष्ट्राला गालबोट लावणारे हे  विधेयक त्वरित मागे घ्यावे असे बबनराव  लोणीकर यांनी प्रसारमाध्यमांशी  बोलताना सांगितले. पुढे त्यांनी राज्यपाल, कुलगुरू आणि कुलपती यांचे अधिकार कमी करण्याचे कट कारस्थान हे महा विकास आघाडी सरकार करत आहे.शेवटी त्यांचा सह युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीत देत या सरकारचा पुनश्च  जाहीर  निषेध केला आहे. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष, सतीश निर्वळ, गणेश खोवणे, संदीप गोरे, कैलास बोराडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अविनाश राठोड, महादेव बाहेकर, विलास घोडके, नितीन सरकटे, आनंद वैद्य, बाबासाहेब सरकटे, पवन केंधळे,राहुल बाहेकर,दिनेश श्राफ, अशोक राठोड,गजानन फुपाटे, वैभव नरवडे  इतर युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत