सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेतकरी क्रांती सेनेच्या पदाधिकारी नियुक्त्या





:मंठा(सुभाष वायाळ) शेतकरी क्रांती सेना च्या माध्यमातुन शेतकरी हिताचे कामं आपण राबवणार आसुन येत्या काळात राज्यात सर्वात मोठी शेतकरी चळवळ उभी करणार आसल्याचे शेतकरी क्रांती सेना च्या पदाधिकार्यांनी म्हंटले आहे. यामध्ये शेतकरी क्रांती सेना युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी विष्णु जगणराव काकडे तर शेतकरी क्रांती सेना युवक आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदि सचिन दारासिंग जाधव यांची नीयुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकार्यांनी आता शेतकरी चळवळीचा मार्ग स्विकारुन शेतकरी हितासाठी लढा द्यावा आसे नियुक्तीपत्रात शेतकरी क्रांती सेनाचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. शेतकरी परीषद, ऊस परीषद, कापुस परीषद व शेतकरी हितासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा संकल्प नवनिर्वाचीत पदाधिकारी यांनी केला आहे‌. शेतकरी हितासाठी कोणतीही तडजोड न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे‌. आसे नियुक्तीपत्रात संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. यावेळी शेतकरी क्रांती सेना युवक आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, निकेश चव्हाण, राजु पवार आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत