सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा , आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

 मंठा-(सुभाष वायाळ) दि.06 मंठा येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.एस.यु.  वायाळ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगदीश राठोड, श्री संतोषराव बोराडे, श्री सुशील घायाळ उपस्थित होते. यामध्ये सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशपाक शेख यांनी केले. तर प्रास्ताविक बाळासाहेब खराबे यांनी केले.बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचे औचित्य साधून मंठा येथील पत्रकार बांधवांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयुब पठाण व उस्मान पठाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.तर रफिक सय्यद यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माऊली बाहेकर,आशिष मोरे, आयुब खान व परिसरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत