सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर चे माजी नगराध्यक्ष तथा योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एल. एस .पाटील यांचे निधन...

परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मा. एल. एस. पाटील  आज दु. 4 वाजता निधन झाले .. आपल्या 90 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले. नौकरीच्या निमित्ताने खान्देशातून परतूर ला येऊन स्वतःचे एक प्रस्थ निर्माण केले. बांधकाम खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन शासकीय गुत्तेदार म्हणून नावलौकिक कमावला . परतूर तालुक्यात अनेक रस्ते, शासकीय इमारतीची कामे केली. कठोर परिश्रम, मृदू वाणी ही त्यांची बलस्थाने होती. स्वत च्या इच्छा शक्तीच्या जोरावर ते अखेर पर्यत कार्यरत होते. गेल्या 10 वर्षात शिक्षण संस्थेच्या कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी संस्थेची इमारत उभी करून दाखवली.
' पप्पा ' या टोपण नावाने सर्व परतूरवासियात ते परिचित होते..
  

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत