सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी शेख अब्‍दुल रहीम. एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र...

परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
 ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल परतूर या माध्यमिक विद्यालयात ज्युनियर के. जी. ते इ 10 वी पर्येंत शिक्षण घेतलेल्या शेख अब्दुल रहीम हुसेन* यांनी नीट परीक्षेत 566 गुण घेत शासकीय मेडिकल कॉलेज , गोंदिया येथे (MBBS)* साठी प्रवेश मिळाल्याबद्दल ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल, परतूर येथे शेख अब्दुल रहीम व त्यांचे बंधू श्री अब्दुल्ला सर* यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रहीम ला ब्राईट स्टार ची Academic excellence ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री खणके सर,शेख सर, राम सर, कुकडे सर, सय्यद सर,अंभुरे मॅडम,सकलेचा मॅडम, गिरी मॅडम हे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.शेख अब्दुल राहिम ने हे यश संपादन केल्याबद्दल श्री राजबिंडे सर, श्री शब्बीर सर , श्री  भालेराव सर  शाळेचे मुख्याध्यापक श्री खणके सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत