सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर सार्वजनिक सेवाजन्मोत्सव समितीची कार्यकारणी जाहीर अध्यक्ष पदी कैलास चव्हाण तर सचिव पदी प्रमोद राठोड

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
 परतुर सार्वजनिक सेवालाल महाराज जयंती जन्मोत्सव 2022 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही सतगुरू सेवालाल महाराज जयंती 15 फेबुरुवारी रोजी मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधव  जयंती साजरी करणार आहे या बैठकीमध्ये अध्यक्ष पदी कैलास चव्हाण तर सचिव पदी प्रमोद राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
सुनिल राठोड -उपाध्यक्ष
अर्जून राठोड-सहसचिव
विलास राठोड -सहसचिव
संजय चव्हाण-कोषाध्यक्ष
सचिन चव्हाण -सहकोषाध्यक्ष
किशोर जाधव -संयोजक
राहूल राठोड -सहसंयोजक
राहूल नारायण आढे -कार्यवाहक
अमोल पवार -सहकार्यवाहक
किरण आढे-प्रसिद्धी प्रमुख
सदस्य -पवन आढे,सचिन पवार, सचिन आढे, अविनाश राठोड, इंजी गणेश चव्हाण, रवी आढे, राहूल चव्हाण, डॉक्टर मनोज राठोड, इंजि. प्रशांत जाधव, वैभव राठोड, इंजि.कुलदीप राठोड,इंजि.राहूल रोहिदास राठोड.
 सर्व बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत