सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मा. ना .बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री)यांच्यावर केलेल्या आरोपातून व या संकटातून नक्कीच ते बाहेर पडतील . - अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
 जालना प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राज्य मंत्री ओम प्रकाश बच्चुभाऊ कडू साहेब हे एक महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर एक लोकप्रिय नेते आहेत. तसेच महाराष्ट्रात व भारतात अपंगासाठी व निराधारांसाठी लोकांचे दैवत आहेत अहोरात्र अपंग व निराधारांसाठी झटणारे आणि न्याय मिळून देण्यासाठी व  शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात अशा प्रकारचे काम इतरांना ते जमत नाही म्हणून त्यांना एक प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून एखाद्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु भाऊ च्या पाठीमागे करोडो अपंग बांधव निराधार शेतकरी या लोकांचा आशीर्वाद आहे यामुळे भाऊंना बदनाम करण्याचा व एखाद्या प्रकरणात गोवण्याचा काही फरक पडणार नाही ते लवकर या आरोपातून नक्कीच बाहेर पडतील ही काळया दगडावरची रेघ आहे असे  प्रसिद्धी पत्रकामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत