सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रा. नवले यांची भारतीय संग्राम परिषदेच्या जालना जिल्हा निरीक्षक पदी निवड





परतूर /प्रतिनिधी(हनुमंत दवंडे )

शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिवसंग्रामच्या सोमवार दिनांक २४ जानेवारी २०२२ च्या राज्यस्तरीय बैठकी मध्ये येणान्या काळातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरच्या निर्णयास अनुसरून भारतीय संग्राम परिषद ज्या जिल्ह्यात निवडणूक लढवणार आहे अशा जिल्ह्यांवर निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत जालना या जिल्ह्याकरिता भारतीय संग्राम परिषद या पक्षाच्या वतीने जिल्हा निरीक्षक म्हणून प्रा. लक्ष्मण नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नुकतेच त्यांना आ. विनायकराव मेटे यांच्या हस्ते मुंबई येथे नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली 
        स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जालना या जिल्ह्यातील निवडणुकीची पूर्व तयारी, शिवसंग्राम संघटनेची बांधणी, मतदार संघ व इच्छुक उमेदवारांची चाचपणी, जिल्ह्यात शिवसंग्राम संघटनेची सद्यस्थिती या अनुषंगाने स्थानिक जिल्हाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत बैठका घेणे, चर्चा करणे, उमेदवार निवड, नियुक्त्या वगैरे संबंधी निर्णय घेणे, व सदरच्या निवडणुकीत भारतीय. संग्राम परिषदेच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे .   याकरिता त्यांना पुढील वाटचालीस परतूर शिवसंग्राम तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन खरात  यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी  शिवसंग्राम पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत