सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पहिली राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत सोतोकान कराटे टिमचा विजय.


    परतूर / प्रतिनिधी. हनुमंत दवंडे..
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व किनवट येथील लक्ष्मीबाई यशीमोड सेवाभावी संस्था किनवट च्या विद्यामाने दि.  ०५ व ०६ रोजी किनवट येथील क्रिडा संकुल साई मंदिर परिसरात सकाळी १०,वा. किनवट येथे कराटे स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते         या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन मा.स.जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजारा यांच्या हस्ते करण्यात आले. यास्पर्धेला पंधरा जिल्ह्यातील कराटे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत परतूर च्या सोतोकान कराटे डो इंडिया. संघाने सहभाग नोंदवत  बाजी मारत.ट्राँफी आपल्या नावे केली. व मेडल प्राप्त करण्यात यशस्वी झाले.सहभागी कराटे विध्यार्थी  वैष्णवी घोडे.दुर्गा शेळके. वैष्णवी शेळके. साक्षी नरवैय.शिवानी पाल.आरती शिंदे.अभिषेक पावले. अजय गिरी. अब्बूजर शेख. रेहान शेख. दिव्या वाकळे.भक्ती कोरडे. श्रावणी लोहगावकर.साधना सोळंके. विक्रम सोळंके.अजलान शेख.राज वाघमारे.शे.मोहम्मद मलिक मोहम्मद मुराद.पुर्थवीराज कोरके.वैभव येडे. वेदांत कुकडे. विक्रम रनबावळे.अर्णव तापडीया.रूद्र घाडगे.हर्ष बागुल.यांनी आपला बेस्ट देत सर्वांनी मेडल प्राप्त केले. यांना कराटे मास्टर माणिक जैस्वाल व रोहित जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.किनवट येथील स्पर्धे चे आयोजक संदिप यशीमोड यांनी परतूर कराटे टीम व कोच यांना  ट्राँफी,देऊन सन्मानित केले.
परतूर येथील  नागरीक, व,पालक यांनी किनवट येथून परत आल्या नंतर परतूर रेल्वे स्टेशनवर माणिक जैस्वाल, रोहित जैस्वाल,व सर्व टिमचे हार घालून ढोल ताषेच्या गजरात स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत