सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

श्रीराम मंदिर संस्थानचा अनोखा श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.

परतुर विशेष प्रतिनिधी विठ्ठल कुलकर्णी 
   दोन वर्षाच्या कोरोना महामारीमुळे साधेपणाने साजरा झालेला श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.गेल्या दोन वर्षाचा खंड पडल्यामुळे यावर्षी अभुतपुर्व गर्दी या उत्साहाला होती.
श्रीराम मंदिर संस्थान परतुरचा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास अनेक वर्षाची परंपरा आहे यावर्षी सुध्दा हा जन्मोत्सव उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा झाला.सोंगाव्दारे रामाचा जन्मोत्सव सोहळा दृश्य रुपात भक्तासमोर दाखवला जातो ज्याव्दारे प्रत्यक्ष जन्मोत्सव सोहळा अनुभवन्याचे भाग्य आपणास लाभत आहे अशी श्रीराम भक्ताचा भावना निर्माण होते.ईस्काँनच्या भक्तमंडळीने भजनाचे आयोजन करुन या उत्साहात भर घातली.आपल्या खुमासदार शैलीत धनंजय जोशी सर यांनी कथा सांगितली.आजच्या या रामनवमीच्या मुर्हुतावर शिवसेना जिल्हा संघटक मोहनजी अग्रवाल यांनी भक्ताची गरज लक्षात घेता 10 लाख रु.सभामंडप देण्याची घोषणा केली.यावेळी सोहळ्यात दशरथ राजे-कांतराव देशमुख,सुमंत प्रधान-शुभम सातोनकर,वशिष्ट ऋषी-प्रसाद बाप्ते,गंधर्व-शिवाजी काटे,शृंगऋषी-संजय सातोनकर,कांदे महाराज-सागर नंद रंभा-कु.आर्या कुलकर्णी तर भालदार-चोपदार श्रीपाद सातोनकर,प्रशांत डोम यांनी पात्र सादर केले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.गंगाधरराव पुराणिक, बाप्ते,अरुणराव शेपाळ,सुरेश नंद, दासोपंत पुराणिक संतोष नंदगोविंद सातोनकर,रामराव नंद,शामराव नंद,खंडेराव कुलकर्णी,सिध्दार्थ कुलकर्णी,विठ्ठल कुलकर्णी,गजानन सातोनकर,अंजिक्य पुरी आदीनी परिश्रम घेतले.ईस्काँन परिवारातर्फ फराळ वाटप करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत