सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वाळूच्या टेम्पोला धडकून दुचाकी स्वार गंभीर जखमी

तळणी : प्रतिनिधी रवी पाटील
दुचाक  स्वारा ची वाळूच्या टेम्पोला धडकून गभीर जखमी झाल्याची घटना तळणी येथील पूर्णा पाटीजवळ घडली असून दोनही गंभीर जखमीना जालना येथे उपचारासाठी पाठवले असल्याची माहीती तळणी बीटचे जमादार सुभाष राठोड यानी सांगीतले 
         दोनही तरुण दहीफळ खंदारे येथील असून त्याची नावे सांरंग काळे व मनोज असल्याची माहीती तळणी पोलीसांनी दीली घटना घडताच तळणी पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेऊन अडकलेल्या वांहनांना रस्ता सुरळीत करून दिला दुचाकीस्वाराचे नियञण सुटल्याने चुकीच्या दिशेने जाऊन वाळूच्या च्या टेम्पोवर धडकल्याचे प्रत्यक्ष्य दर्शीने सांगीतले अपघात होताच घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती सदर वाळूने भरलेला टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखडी दुभाजकला अडकला असल्याने तो काढण्यासाठी पोलीसांचे प्रयत्न चालू होते सदर घटनास्थळाचा पंचनामा करून व जखमीची माहीती मिळवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया तळणी पोलीस ठाण्यात चालु होती आशी माहिती एस ओ घोडके पोलीस शिपाई यानी दिली


Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत