सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अहिल्याबाई होळकर उत्सव समितीची बैठक संपन्न...


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दंवडे
राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त उत्सव समितीची परतूर विश्रामगृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत अहिल्याबाई होळकर उत्सव समिती परतुर अध्यक्षपदी नामदेव गोरे, उपाध्यक्षपदी दत्ता कोल्हे ,तर सचिव पदी हनुमंत दवंडे यांची निवड करण्यात आली.अहिल्याबाई होळकर जयंतीच्या नियोजनासंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली या बैठकीत राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती सर्व धर्मीय व सर्वपक्षीय घेण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व समाज बांधवांना जयंती उत्सव कार्यकारणी मध्ये सामाविष्ट करून घेऊन जयंती उत्सव बहुजन प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने 31 मे रोजी समाज बांधव अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जात असतात त्यामुळे परतूर येथे 3 जून रोजी कार्यक्रम घेण्यात येणार आहे .भव्य दिव्य अशी मिरवणूक परतूर रेल्वे गेट ते परतूर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. व शेवटी समारोप सुद्धा तहसील कार्यालयासमोर होईल या बैठकीला उपस्थित म्हणून.
संयोजक कमिटी .
हारेराम माने , शिवाजीराव भालेकर शिवाजीराव तरवटे, रासपा नेते, सोपान गोरे परतुर, बाबुराव गोसा वी विष्णू गुंजाळ, नारायणगाव भिसे , रमेशराव आढाव, हरणाजी आढाव विष्णू पितळे, नारायण काळदाते, राम दुगाने, उद्धवराव शेंडगे, बाबासाहेब आढाव, प्रकाश दिवटे, गणेश डुकरे, महेश हिंगे, तात्याराव धोत्रे,विलास रोकडे, प्रमोद पिसाळ अक्षय आढाव कृष्णा गायकवाड ज्ञानोबा बोराटे विलास तरवटे, मंगेश आढाव शंकर भालेकर ,महादेव गायकवाड, जीवनर रेगले, दादाराव बकाल, भारत मोगरे, आदींची उपस्थिती यावेळी होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत