सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 - रेल्वे कर्मचारी व लॉयन्स क्लबच्या वतीने रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
      येथील स्थानिक रेल्वे विभाग व लॉयन्स क्लबच्या वतीने सोमवारी रेल्वेस्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.संदीप चव्हाण,डॉ. नंद, स्टेशन प्रबंधक अमरदीप,पत्रकार राजकुमार भारुका,आरपीएफचे राजमल्ली, मेघराज पाटील, राजेश उबाळे, सुमित खालापूरे प्रा भोसलेसर गजानन तागडे शंकरसेठ अग्रवाल अशोक ठोके आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. संदीप चव्हाण यांनी म्हटले की, वृषारोपन ही काळाची गरज असून झाडे जगली तरच पर्यावरण टिकेल पर्यावरणच संतुलित जीवन आहे याची जाणीव सर्वांनी आत्मसाथ करणे ही काळाची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी रेल्वेस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत