सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पक्ष बळकट करण्यासाठी सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यावर भर द्या.-जिशान शेख रॉ. कॉ.परतूर मंठा विधानसभा निरीक्षक


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दि. 19 रोजी परतूर येथे आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या आढावा बैठकीत परतूर विधानसभा पक्ष निरीक्षक जीशान यांनी काढले यावेळी व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस पंकज बोराडे,युवकाचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,तालुका अध्यक्ष रमेश सोळंके,विजय राखे,अखिल काजी,भागवत कडपे आदी उपस्थित होते. 
       यावेळी  बोलताना श्री खान म्हणाले की पक्ष स्थापने पासून ते आज पर्यंत पक्षातील नेते कार्यकर्ते हे सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत आला आहे याची पावती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत मिळाल्या शिवाय राहणार नाही असे सांगत निवडणुकीच्या तयारी ला लागा असे सूतोवाचक दिले यावेळी पंकज बोराडे,कपिल आकात यांनी पण उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंठा युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब घारे, परतूर तालुका अध्यक्ष ओंकार काटे,परतूर शहर अध्यक्ष राजेश तेलगड,पंजाबराव अवचार,योगेश बरकुले,कदिर कुरेशी,रजाक कुरेशी, शेख अफरोज, अनवर पठाण,गजानन अँभुरे,बंटी चव्हाण,सचिन चव्हाण,बाळासाहेब चव्हाण, महेश नागरे,सत्तार कुरेशी,योगेश अवचार, सोनाजी गाडेकर, माऊली डाव्हरे, भागवत चव्हाण, अमर सोळंके,दीपक सवणे आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत