सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी - अभिजीत कोदंडे


प्रतिनिधी -सुभाष वायाळ
माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे मराठवाड्यातील कष्टकरी शेतकऱ्यांचे संघर्षशील नेतृत्व असून लोणीकर यांनी गत मंत्रिपदाच्या काळात केवळ मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात पिण्याचे शुद्ध फिल्टर चे पाणी गरिबातील गरीब सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत मिळावे यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साथीने मराठवाड्यात महत्त्वकांक्षी अशी योजना मराठवाडा वॉटर ग्रीड साकार केली.
 ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, राजस्थान, कर्नाटक अशा विविध ठिकाणी जाऊन त्या त्या देशात व राज्यांमध्ये कार्यान्वित असलेल्या वॉटर ग्रीडच्या योजनांचा अभ्यास करून अशी योजना महाराष्ट्रात सुद्धा कार्यान्वित होऊ शकते व त्या दिशेने तत्कालीन भाजप सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली.

  मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना,परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या शहरांमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड हा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचे ठरले परंतु सरकार बदलले गत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड करिता भरीव निधीची तरतूद करावी अशी वारंवार मागणी केली सभागृहात सुद्धा वेळोवेळी आवाज उचलला परंतु गत सरकारने महत्त्वाकांक्षी असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प रद्द करण्याचे महापाप केले.

 गत पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे योजना जलकुंभाच्या उभारणी, डांबरीकरणाचे रस्ते, परतुर एमआयडिसी मध्ये रुबन योजना प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतीला वीज मिळावी याकरिता 132 के व्ही - 133 केव्ही उपकेंद्र उभारणी यासह अनेक विकास कामांवर भर दिला.

 दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर पाई वारी मध्ये पायी वारी करणाऱ्या शेतकऱ्यांना - वारकऱ्यांना रस्ते अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या वारकऱ्यांना खरी श्रद्धांजली म्हणून पंढरपूर वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यां करिता शेगाव ते पंढरपूर विशाल असा दिंडी मार्ग साकारण्यात आला.

 तत्कालीन महा विकास आघाडी सरकारच्या काळात निधीअभावी अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प रखडलेले आहेत ती पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्र मराठवाड्याला समृद्ध बनवण्याकरिता आमदार बबनराव लोणीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची खरी गरज असल्याची मागणी भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक अभिजीत कोदंडे यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत