सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी एकत्र या........ प्रकाश सोनसळे


बीड प्रतीनीधी
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश  सोनसळे अध्यक्ष- धनगर समाज महाराष्ट्र राज्य हे अणेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.
    आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहारहार अर्पण करून अभिवादन माऊली मारकड, लिंबाजी महानोर, विठ्ठल शिंदे , यांच्या हस्ते करण्यात आले.
 राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिल शेळके ,यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी चांगण , यांच्या हस्ते करण्यात आले.
    समाज बांधवांना संबोधित करताना प्रकाश  सोनसळे यांनी म्हटले की अहिल्यादेवी होळकरांचे विचार व कार्याचा जागर करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे.
  यावेळी हनुमंत काळे कृषी अधिकारी बीड ,रवींद्र गाडेकर माजी सरपंच पारगाव , साईनाथ कैतके सरपंच धनगरवाडी, बाळासाहेब ढवळे, दत्ता किवणे, अंकुश गवळी पत्रकार,विशाल प्रभाळे,बाबर ,राजु खंडागळे,रामा लकडे,चांगण ,मारकड टेलर, काळे ,शेळके ,आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत