सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

आमदार बबनराव लोणिकर यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात यावे -शुभम कठोरे

परतूर प्रतीनिधी हनुमंत दवडे
आमदर_बबनरावजी_लोणीकर_साहेब हे लहान पणा पासुनच भारतीय जनता पक्षाचे चाहते आहेत.पुर्वी कांग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नेहमी केंद्रात व राज्यात राहायची. पंरतु सत्ता असो किंवा नसो लोणीकर साहेब हे एकनिष्ठ स्व, गोपिनाथरावजी मुंडे साहेब, स्व, प्रमोदजी महाजन, साहेब यांच्या सोबत राहून परतुर मंठा मतदारसंघातील सर्व साधारण जनतेची सेवा केली, ते लोणी ग्रामपंचायत पासुन त्यांनी महाराष्ट्र राज्याची पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ही धुरा सर्व जनतेला सोबत घेऊन सांभाळली, त्यांना पद कोणतेही असो त्यांनी त्या पदाला साध्य नाही तर साधन समजल आणि त्या साधनातुन परतुर मंठा मतदारसंघाची सेवा च नाही तर परीवर्तन घडविण्याचे काम केले, मागील भाजपा व शिवसेना मंत्री मंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे पद दिले होते त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कुटुंबाला शौचालय दिले, शेतकर्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले त्यांचा कार्यकाळात महाराष्ट्राला पाण्या अभावी दुष्काळाची झळ ही देखील लागु देली नाही  आता  एकनाथ संभाजी शिंदे साहेब व देवेेंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे व भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्ता स्थापित झालेले आहे नवीन मंत्री मंडळाची निवड होणार असून त्यामधे परतुर मंठा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांना मंत्री मंडाळात घ्यावा अशी मतदारसंघातील जनतेची नम्रतेची विनंती आहे..

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत