सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांचा वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर :-सचिन खरात तालुकाध्यक्ष





परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
बहुजन नायक आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीधर जवळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली होती त्यात शिबिरामध्ये बी पी ,शुगर, रक्त तपासणी, सर्दी ,खोकला, ताप ,अशा सर्वच आजाराची तपासणी त्या शिबिरामध्ये करण्यात आली होती 
     त्या शिबिराचा लाभ सर्वच जास्तीत जास्त महिलांनी व गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्या शिबिरामध्ये .दीपक तारे सर, शिवहरी डोळे सर, संतोष संमेटा सर,दिपक वैद्य सर, प्रदीप चव्हाण सर आधी डॉक्टर उपलब्ध होते त्यावेळेस गावातील सरपंच वसंत राजबिंडे , सचिन खरात तालुकाध्यक्ष शिवसंग्राम,आबासाहेब बागल, तुकाराम राजबिंडे, सिद्धेश्वर राजबिंडे, भानुदास बागल, भारत राजबिंडे, अमोल राजबिंडे, भागवत काटे आधी गावकरी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत